दुबई, 1 एप्रिल : गेल्या वर्षभरात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने देश-परदेशात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेट संघाने कसोटी आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखताना, कसोटी अजिंक्यपदाचा मानाचा राजदंड मिळवला आहे. विशेष म्हणजे भारतानं सलग तिसऱ्यांदा हा राजदंड स्वतःकडे राखण्यात यश मिळवलं आहे. यासह भारतीय संघाला 10 लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीसही देण्यात आले.
भारतीय संघ कसोटी क्रमवारीत 116 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर 108 गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. याबाबत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू सव्हनी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यांनी, ''आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपदाचा मानाचा राजदंड पटकावणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. विराट कोहलीनं क्रिकेटच्या तीनही स्वरूपात ज्या प्रकारे खेळी केली आहे, त्याचे विशेष कौतुक.
तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने, ''आयसीसीचा हा राजदंड पुन्हा पटकावल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या संघाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे आणि हा गौरव त्याच कामगिरीची पोचपावती आहे. कसोटी क्रिकेटचे महत्त्व आम्ही जाणून आहोत.'' अशी प्रतिक्रिय दिली.
"I am sure this will stand us in good stead once the ICC World Test Championship commences later this year." – Virat Kohli on India's retention of the ICC Test Championship mace.
दरम्यान कर्णधार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर 30 मे ते 14 जुलै यादरम्यान इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारील भारतीय संघ लागेल. 6 जूनला भारत साऊथ आफ्रिका विरोधाला विश्वचषकातला आपला पहिला सामना खेळणार आहे.