भारतीय महिला क्रिकेट संघ 12 वर्षांनंतर वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

भारतीय महिला क्रिकेट संघ 12 वर्षांनंतर वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

  • Share this:

21 जुलै : आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय महिलांनी सर्वप्रथम फलंदाजी करत २८१ धावांपर्यंत मजल मारली.

या खेळीत भारताची हिरो ठरली ती मधल्या फळीतली फलंदाज हरमनप्रीत कौर. ११५ बाॅल्समध्ये १७१ धावा करत हरमनप्रीतने भारतीय डावाला आकार दिला. हरमनप्रीतच्या या खेळीत २० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या डावाची सावध सुरूवात केली. मात्र एकामागून एक त्यांच्या विकेट्स पडत गेल्या आणि अखेर भारतीय महिलांचं वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 10:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading