भारताची ही टीम पाकिस्तानात जाऊन खेळणार

भारताची ही टीम पाकिस्तानात जाऊन खेळणार

भारत-पाक संबंध ताणलेले असताना क्रीडा क्षेत्रातून आली मोठी बातमी.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : भारत पाकिस्तान संबंध ताणले गेलेले असताना क्रीडा क्षेत्रातून एक मोठी बातमी आली आहे. आगामी डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामने इस्लामाबादला जाऊन खेळण्यास भारतीय टेनिस संघटनेने मान्यता दिली आहे. All India Tennis Association ने यासंदर्भात माहिती दिली आहे.

येत्या 29 आणि 30 नोव्हेंबरला किंवा 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या तारखांना भारत विरुद्ध पाकिस्तान डेव्हिस कप टाय पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये खेळली जाईल.

पाकिस्तानात भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. याविषयी अखिल भारतीय टेनिस संघटनेनं म्हटलं आहे की, खेळाडूंच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल. नोव्हेंबरच्या शेवटी होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय खेळाडूंची सुरक्षा व्यवस्था चोख असेल तरच भारतीय टीम खेळायला मैदानावर उतरेल.

हे वाचा - भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूला व्हायचंय लंडनचा महापौर!

पाकिस्तानमधल्या सुरक्षा व्यवस्थेची 4 नोव्हेंबरला एकदा तपासणी करून मगच खेळण्याचा निर्णय घेतला जाईल, असंही संघटनेनं म्हटलं आहे. जर इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था समाधानकारक नसेल तर भारत-पाक सामन्यांचं ठिकाण अन्य ठिकाणी हलवलं जाईल. हे ठिकाण एखाद्या दुसऱ्या देशात असू शकेल. न्यूट्रल व्हेन्यू ठरवायचा की नाही याचा निर्णय 4 नोव्हेंबरला घेण्यात येईल.

हेही वाचा - मोबाईल हरवला आता चिंता नको! सरकार शोधणार तुमचा फोन

जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा देणारं कलम 370 काढून घेतल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध आणखी ताणले गेले आहेत. दोन्ही देशातली सांस्कृतिक देवाण-घेवाण पूर्णपणे थांबली आहे. दोन्ही देशातील खेळाडूंनी आणि कलाकारांनीही एकमेकांच्या देशात खेळायला जायलाही नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय टेनिस संघटनेने घेतलेली पाकिस्तानात खेळण्याची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा ही जागतिक पातळीवरची महत्त्वाची स्पर्धा मानली जाते.

----------------------------------------

VIDEO : मनसे निवडणूक लढवणार की नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 08:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading