मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, हैदराबादमध्ये कुणाचा दबदबा? अशी असेल दोघांची संभाव्य प्लेईंग XI

Ind vs Aus: टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, हैदराबादमध्ये कुणाचा दबदबा? अशी असेल दोघांची संभाव्य प्लेईंग XI

भारत ऑस्ट्रेलिया तिसरी टी20

भारत ऑस्ट्रेलिया तिसरी टी20

Ind vs Aus: पहिल्या दोन्ही वन डेत भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण भारतीय गोलंदाजांना मात्र आशिया कपपासून अद्यापही सूर सापडलेला नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

हैदराबाद, 25 सप्टेंबर: शुक्रवारी नागपूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या दुसऱ्या टी20त अवघ्या 16 ओव्हर्सचाच खेळ झाला. भारतानं ती मॅच 6 विकेट्सनी जिंकली आणि मालिकेत बरोबरीत साधली. पण आता हैदराबादच्या तिसऱ्या टी20त मात्र दोन्ही संघ मालिकाविजयासाठी सज्ज झाले आहेत. आज संध्याकाळी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरी आणि अखेरची टी20 मॅच खेळवली जाणार आहे.

टीम इंडिया पुन्हा बदल करणार?

पहिल्या दोन्ही वन डेत भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण भारतीय गोलंदाजांना मात्र आशिया कपपासून अद्यापही सूर सापडलेला नाही. अक्षर पटेल वगळता भारतीय गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे. मोहाली टी20त तर भारताला 209 धावांच्या आव्हानाचा बचाव करता आला नाही. तर नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियानं 8 ओव्हर्समध्ये 90 धावा फटकावल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या या डिपार्टमेंटकडे लक्ष देणं भारतीय संघव्यवस्थापनासाठी महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा - MS Dhoni: रिटायरमेंट नाही तर धोनीनं केलं एका प्रॉडक्टचं रिलॉन्चिंग, पण का? पाहा Video

वेडला लगाम घाला...

ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर बॅट्समन मॅथ्यू वेड सध्या तुफान फॉर्मात आहे. त्यानं दोन्ही टी20त नाबाद खेळी केल्या आहेत. वेडच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं मोहाली टी20 जिंकली होती. तर नागपूरमध्येही त्यानं अवघ्या 20 बॉलमध्ये नाबाद 43 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे वेडला आवर घालणं भारतासाठी गरजेचं आहे.

रोहितच्या नेतृत्वात सलग नववा मालिकाविजय?

हैदराबाद टी20 जिंकल्यास टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या नावे एका नव्या विक्रमाची नोंद होईल. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत 2-1 असं वर्चस्व गाजवेल. तसं झाल्यास रोहित पूर्णवेळ कॅप्टन बनल्यानंतर भारताचा द्विपक्षीय मालिकेतला हा सलग 9वा मालिकाविजय असेल.

भारत वि. ऑस्ट्रेलिया

राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद

संध्याकाळी 7.00 वाजता

स्टार स्पोर्टस आणि हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण

 भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन - रोहित शर्मा (कप्तान), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन - फिंच, ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मॅथ्यू वेड, नॅथन एलिस, झॅम्पा, हेझलवूड

First published:

Tags: Cricket, India vs Australia, Sports