ओव्हल (लंडन), 12 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या (Ind vs Eng T20) मालिकेनंतर भारत आणि इंग्लंडमध्ये आजपासून एकदिवसीय मालिकेला (Ind vs Eng ODI Series) सुरुवात होत आहे. तीन टी-20 सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली होती. आता एकदिवसीय मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताचा गोलंदाजी निर्णय -
भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकला आहे. भारताने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना होत आहे. दुखापतीमुळे विराट कोहली पहिला सामना खेळत नाही आहे. विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याचवेळी शिखर धवन रोहित शर्मासोबत फलंदाजी करताना दिसणार आहे.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रशांत कृष्णा आणि युझवेंद्र चहल.
इंग्लंड - जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, लियाम लिव्हिंग्स्टन, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडेन कार्स, मॅट पार्किन्सन आणि रीझ टोपली.
हेही वाचा - IPL खेळता पण टीम इंडियाकडून खेळताना.... गावसकरांनी घेतली दिग्गजांची हजेरी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england