राष्ट्रकुल स्पर्धेत थाळीफेक प्रकारात सीमाने रौप्य तर नवजीतने केली कांस्य पदकाची कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेत थाळीफेक प्रकारात सीमाने रौप्य तर नवजीतने केली कांस्य पदकाची कमाई

सीमा पुनियानं 60.41 मीटरपर्यंत थाळी फेकली. तर नवजीतनं 57.43 मीटरपर्यंत थाळी फेकत पदक आपल्या नावावर केलंय

  • Share this:

 12 एप्रिल:   राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड अजूनही सुरूच आहे . आता आज थाळीफेक प्रकारात भारतानं दोन पदकांची कमाई केली आहे. भारताच्या सीमा पुनियानं रौप्य पदक पटकावलय, तर नवजीत कौर धिलोननं कास्य पदकाची कमाई केलीय.

सीमा पुनियानं 60.41 मीटरपर्यंत थाळी फेकली.  तर नवजीतनं 57.43 मीटरपर्यंत थाळी फेकत पदक आपल्या नावावर केलंय. नवजीतची आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. पदकतालिकेत भारताला 14 सुवर्ण,7 रौप्य़, आणि 10कांस्य पदकांसह 31 पदकं कमवले आहे.  सीमा पुनिया ही  हरयाणाची रहिवाशी आहे.ती 34 वर्षांची असून 2006 पासून राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेत आहेत. आतापर्यंतच्या प्रत्येक स्पर्धेत  तिने  पदक मिळवून दिलेलं आहे. सीमाची ही शेवटची राष्ट्रकुल स्पर्धा आहे.

या यशामुळे  भारताचा कॉमनवेल्थमधला भारताचा टक्का वाढला आहे. विशेष म्हणजे यंदा पदकतालिकेत भारताच्या महिला खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली आहे.

First published: April 12, 2018, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading