S M L

सिंधूची फायनलमध्ये धडक,आता कॅरोलिना मरिन लढत

फायनलमध्ये पी.वी सिंधूचा सामना हा रियो आॅलिंपिकची सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरिन हिच्यासोबत होईल.

Sachin Salve | Updated On: Apr 1, 2017 08:57 PM IST

सिंधूची फायनलमध्ये धडक,आता कॅरोलिना मरिन लढत

01 एप्रिल :  आॅलिंपिक रौप्यपदक विजेती बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने इंडिया ओपनच्या सेमिफाइनलमध्ये कोरियाची खेळाडू सून जी ह्यूनला मात देत फायनलमध्ये धडक मारलीये.

सिंधू आणि सून जी ह्यून या दोघांमधील सामना चांगलाच रंगला, परंतु सिंधूने पहिला गेम हा 21-18 ने आपल्या खिशात घातला. त्यानंतर सून जी ह्यून ने जबरदस्त वापसी करत सिंधूला दुसऱ्या गेममध्ये 14-21 नी मात देत, स्कोर 1-1 ने बरोबर केला.

शेवटच्या गेममध्ये सिंधूने आपल्या प्रतिस्पर्ध्याला परत येण्यापासुन चांगलेच रोखुन धरले. आणि सेमिफायनलच्या निर्णायक गेममध्ये 21-14 ने जिंकून फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने सुरुवाती पासूनच चांगली खेळी ठेवली. सिंधूने आपल्या याच खेळाला ब्रेकपर्यंत 11-4 असाच चालु ठेवला. परंतु सून जी ह्यूनने प्रयत्न करत 4 पाँईंट मिळवले, परंतु सिंधूने लगेच सावरुन आपला स्कोर 15-11 वर ठेवला. आणि आपली जागा अंतिम फेरीत निश्चित केली.फायनलमध्ये पी.वी सिंधूचा सामना हा रियो आॅलिंपिकची सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरिन हिच्यासोबत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 08:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close