न्यूझीलंडचा 6 रन्सने पराभव करत भारताने मालिका जिंकली

वनडे सिरीज पाठोपाठ भारताने न्यूझीलंडचा टी 20 सिरीजमध्येही पराभव करत मालिका खिश्यात घातलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2017 11:44 PM IST

न्यूझीलंडचा 6 रन्सने पराभव करत भारताने मालिका जिंकली

07 नोव्हेंबर : वनडे सिरीज पाठोपाठ भारताने न्यूझीलंडचा टी 20 सिरीजमध्येही पराभव करत मालिका खिश्यात घातलीये. तिसऱ्या टी -20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 6 रन्सने पराभव केलाय.

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मंगळवारी तिरुवनंतपुरममध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना 8-8 ओव्हरने खेळवण्यात आला. भारताने आठ ओव्हर्समध्ये 67 रन्सची खेळी केली. भारताकडून सर्वाधिक मनिष पांडेने 17 रन्स केले तर हार्दिक पांड्या 14 आणि विराट कोहलीने 13 रन्स केले. 68 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची चांगलीच दमछाक झाली. अवघा संघ आठव्या ओव्हरमध्ये 61 रन्सवर गारद झाला. न्यूझीलंडकडून कोलिन ग्रँडहोमने सर्वाधिक 17 रन्स केले. गेलन फिलिप्सने 11 रन्स केले. त्यानंतर कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताने 2-1 ने आघाडी घेत टी-20 ची सिरीजही जिंकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 11:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...