Home /News /sport /

WTC Final: भारत-न्यूझीलंड सामन्याने मोडले सगळे विक्रम!

WTC Final: भारत-न्यूझीलंड सामन्याने मोडले सगळे विक्रम!

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मागच्या महिन्यात झालेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (WTC Final) रेकॉर्डब्रेक ठरली आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेला हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सीरिजमधला दोन वर्षातला सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला.

पुढे वाचा ...
    दुबई, 28 जुलै: भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मागच्या महिन्यात झालेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (WTC Final) रेकॉर्डब्रेक ठरली आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेला हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सीरिजमधला दोन वर्षातला सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला. 18-23 जून दरम्यान झालेली ही फायनल 89 क्षेत्रांमध्ये प्रसारित करण्यात आली. हा मुकाबला लाईव्ह पाहाणाऱ्यांची एकूण संख्या 13 कोटी 6 लाख एवढी होती. भारतात ही मॅच सर्वाधिक जणांनी पाहिली. स्टार स्पोर्ट्स आणि दूरदर्शनवर 94.6 टक्के लोकांनी हा सामना पाहिला. या सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेटने विजय झाला. स्टार स्पोर्ट्सने इंग्रजीशिवाय हिंदी, तामीळ, तेलगू आणि कन्नड भाषेतही मॅचचं प्रसारण केलं. न्यूझीलंडमध्ये कमी लोकसंख्या असतानाही प्रेक्षकसंख्या प्रभावी होती. न्यूझीलंडच्या 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पूर्ण रात्र जागून आणि सकाळी लवकर उठून स्काय स्पोर्ट्सवर मॅच पाहिली. ब्रिटनमध्ये स्काय स्पोर्ट्सवर 2019-2021 या कालावधीमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला, ज्यात इंग्लंडची टीम सहभागी नसलेला हा सामना होता. राखीव दिवशी 2015 नंतर इंग्लंडची टीम नसलेला आणि सर्वाधिक पाहिला गेलेला हा सामना ठरला. याशिवाय आयसीसी.टीव्हीवर 145 पेक्षा जास्त क्षेत्रांमध्ये 6,65,100 जणांनी मॅचचं थेट प्रक्षेपण पाहिलं. फायनल मॅचचं थेट प्रक्षेपण 1 कोटी 40 लाख मिनिटं पाहण्यात आलं. मॅचदरम्यान आयसीसीला (ICC) डिजीटल प्लॅटफॉर्मवरही 50 कोटी दर्शक मिळाले. यात फेसबूकवरून सर्वाधिक 42 कोटी 30 लाख दर्शकसंख्या होती. आयसीसीच्या पेजवर 36 कोटी 80 लाख मिनिटांपर्यंत प्रेक्षकांनी व्हिडिओ बघितले. राखीव दिवशी आयसीसीच्या फेसबूक पेजवर सर्वाधिक दर्शकांचा रेकॉर्ड झाला. 24 तासांमध्ये 6 कोटी 57 लाख लोकांनी मॅचसंबंधी व्हिडिओ पाहिले. याआधी हे रेकॉर्ड आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2020 च्या नावावर होतं. त्या मॅचमध्ये 6 कोटी 43 लाख जणांनी व्हिडिओ पाहिले. आयसीसीला इन्स्टाग्रामवरून 7 कोटी प्रेक्षक मिळाले, याशिवाय आयसीसी वेबसाईट, मोबाईल ऍप, ट्विटर आणि युट्यूबवरून 51 कोटी 50 लाख प्रेक्षक जोडले गेले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Icc, India, New zealand

    पुढील बातम्या