मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जे धोनी-गांगुली करु शकला नाही ते Virat Kohli करुन दाखवणार, Team Indiaकडे आहे सुवर्णसंधी

जे धोनी-गांगुली करु शकला नाही ते Virat Kohli करुन दाखवणार, Team Indiaकडे आहे सुवर्णसंधी

Virat Kohli

Virat Kohli

कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli)29 वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार असा विश्वास बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली(Sourav Ganguly) यांनी व्यक्त केला होता.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 19 डिसेंबर: दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौऱ्यादरम्यान सर्वांच्या नजरा टेस्ट क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) टेकल्या आहेत. कारण, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला यंदा इतिहास रचण्याची संधी आहे. भारताला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकदाही मालिका विजय मिळवता आलेला नाही. कॅप्टन कोहली 29 वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार असा विश्वास काहीदिवसापूर्वी, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली(Sourav Ganguly) यांनी व्यक्त केला होता.

टीम इंडिया 1992 मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. गेल्या 29 वर्षांपासून टीम इंडियाला आफ्रिकेच्या जमिनीवर विजय मिळवता आलेला नाही. भारताचे यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणारे सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) या दोघांनाही आफ्रिकेच्या धरतीवर टेस्ट सीरीजमध्ये विजय मिळवता आलेला नाही. मात्र, विराट आता हा इतिहास बदलू शकतो. अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

सौरव गांगुली गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “भारताला यावेळी दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. दक्षिण आफ्रिकन भूमीवर मागच्या 29 वर्षात भारताला एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.” “यंदा अपयशाची ही मालिका खंडित करण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल” असे गांगुली म्हणाले. रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा हे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे दौऱ्यावर जाणार नाहीयत. त्यामुळे संघाच्या अडचणी वाढू शकतात. मागच्या29 वर्षात भारताने सात वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. पण एकदाही त्यांना कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

Team India कडे आहे सुवर्णसंधी

यंदा अफ्रिका संघात मोठे बदल झाले आहेत. 2013 नंतर पहिल्यांदाच संघातून हाशिम अमला, एबी डिविलियर्स आणि फाफ डु प्लेसी यांची उणीव भासणार आहे. या त्रिकुटांचा नेहमी संघाच्या विजयात मोलाचा वाटा असायचा. अमला, डिविलियर्स आणि डु प्लेसी यांनी घरच्या मैदानावर 24 टेस्ट मॅच खेळल्या आहेत ज्यामध्ये 17 वेळा पराभव स्विकारावा लागला आहे.

एबी डिविलियर्स निवृत्ती घेण्यापूर्वी, आफ्रिकन संघाने कसोटी मालिकेत न्यूझीलंड, पाकिस्तान आणि भारताचा प्रत्येकी दोनदा आणि ऑस्ट्रेलियाचा एकदा पराभव केला. आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी अजूनही उत्कृष्ट आहे. त्यांच्याकडे कागिसो रबाडा, एनरिक नॉर्सिया आणि लुंगी एनगिडी सारखे घातक गोलंदाज आहेत जे उसळत्या आणि स्विंगी खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची परीक्षा घेतील.

मात्र, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कमजोर दिसत आहे. संघाचा कर्णधार डीन एल्गरची भारताविरुद्ध सरासरी ३३ आहे. त्याचवेळी उपकर्णधार टेम्बा बावुमा आणि स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक भारताविरुद्ध केवळ 19 च्या सरासरीने धावा करू शकले. अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या एडन मार्करामची अवस्था आणखी वाईट आहे. दुसरीकडे, रसी व्हॅन डर डुसेनने आतापर्यंत भारताविरुद्ध एकही कसोटी सामना खेळलेला नाही. याशिवाय, पहिल्या कसोटी सामन्यानंतर क्विंटन डी कॉक वैयक्तिक कारणांमुळे भारताविरुद्धच्या मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामने (INDvsSA) खेळणार नाही.

भारताकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाज

टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज आहेत. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहेत. अशा स्थितीत रविचंद्रन अश्विन ७व्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावू शकतो. तर भारत 4 वेगवान गोलंदाजांसह जाऊ शकतो.

धोनी-गांगुलीचे स्वप्न अधुरे

2001 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. मात्र, दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने गमावली. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोनदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. 2010-11 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरला होता.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2013-14 मध्ये दुसऱ्यांदा आफ्रिकेचा दौरा केला होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा पराभव पत्करावा लागला. तीन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचा आफ्रिकेचा दौरा केला होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव झाला.

First published:

Tags: MS Dhoni, Sourav ganguly, South africa, Team india, Virat kohli