शमी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार? पत्नी म्हणते, आरोप सिद्ध झाले

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 11:57 AM IST

शमी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार? पत्नी म्हणते, आरोप सिद्ध झाले

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, तो विंडीज दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर शमी पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. भारताचा वेस्ट इंडीज दौरा संपला आहे. आता मोहम्मद शमी कधी परतणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. कोलकत्त्याच्या एका न्यायालयानं शमीविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे.

भारताचा विंडीज दौऱा संपला असून शमी पुढच्या दोन दिवसात भारतात परतू शकतो. त्याला 15 दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2018 मध्ये शमीविरुद्ध त्याच्या पत्नीनं घरगुती हिंसाचाराचा आरोप करत खटला दाखल केला होता. शमी आणि त्याच्या भावाविरुद्ध भादंवि कलम 498 ए नुसार गुन्हा दाखल केला आहे. यानुसार कोलकत्त्यातील न्यायालयानं शमीला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शमीच्या पत्नीने न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, मी अल्लाहचे आभार मानते. मी जे आरोप केले होते ते सर्व सिद्ध झाले आहेत. तो राजरोसपणे माझं आयुष्य उद्ध्वस्त करत होता असा अरोपही शमीच्या पत्नीनं केला.

दरम्यान या प्रकरणात आता बीसीसीआयनं मोठे वक्तव्य केले आहे. बीसीसीआयनं म्हटलं की, शमीवर केलेल्या आरोपांचे आरोपपत्र पाहिल्याशिवाय त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळ शमीला काहिसा दिलासा मिळाला आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, “या प्रकरणात त्वरित कारवाई करणे योग्य होणार नाही. सध्या शमी वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघासोबत खेळत आहे. हा दौरा 3 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल”, असे सांगितले.

Loading...

2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मारहाण केल्याचा, अन्याय आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच हुंड्यासाठी पैसे मागितल्याचाही आरोप केला होता. हसीन जहाँने शमीचे फेसुबक आणि व्हॉट्स अॅप चॅटही प्रसारमाध्यमांसमोर आणले होते. शमीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत असाही आरोप हसीनने केला होता. हसीन जहाँने फक्त शमीविरोधातच नाही तर त्याच्या कुटुंबीयांविरोधातही तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी कौटुंबिक हिंसाचार करण्यात आला असा आरोप तिने केला होता. हसीन जहाँने तिचा पती मोहम्मद शम्मीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले आहेत.

हसीन जहाँने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याची शक्यता व्यक्त केली. आता या सगळ्या प्रकरणांपैकी हुंडा मागणे आणि लैंगिक छळ करणे या दोन प्रकरणात मोहम्मद शमीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही बाब निश्चितच शमीच्या अडचणी वाढवणारी ठरली आहे.

जगातील आक्रमक हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...