मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियाच्या पराभवामुळे पाकिस्तानला झाला मोठा फायदा!

IND vs ENG : टीम इंडियाच्या पराभवामुळे पाकिस्तानला झाला मोठा फायदा!

भारताच्या पराभवाचा पाकिस्तानला फायदा

भारताच्या पराभवाचा पाकिस्तानला फायदा

लीड्स टेस्टमध्ये भारताविरुद्ध दणदणीत विजय मिळवून इंग्लंडने (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. लीड्समध्ये झालेल्या भारताच्या पराभवाचा फायदा पाकिस्तानला (Pakistan) झाला आहे.

  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 28 ऑगस्ट : लीड्स टेस्टमध्ये भारताविरुद्ध दणदणीत विजय मिळवून इंग्लंडने (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. चौथ्या दिवशी भारताने 215/2 अशी सुरुवात केली, पण 63 रनमध्येच भारताच्या उरलेल्या 8 विकेट गेल्या, त्यामुळे भारताचा 278 रनवर ऑल आऊट झाला आणि भारताने हा सामना 76 रनने गमावला. जो रूटच्या (Joe Root) नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा हा पहिला विजय आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात करणाऱ्या चार टीमपैकी इंग्लंडच एकमेव टीम होती ज्यांना विजय मिळाला नव्हता. वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि भारताने प्रत्येकी 1-1 मॅच जिंकली होती. आता इंग्लंडच्या खात्यातही एक विजय आला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.

लीड्समध्ये झालेल्या भारताच्या पराभवाचा फायदा पाकिस्तानला (Pakistan) झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तानची टीम पहिल्या क्रमांकावर आली आहे. लॉर्ड्स टेस्ट जिंकल्यानंतर भारत पहिल्या क्रमांकावर होता. या पराभवामुळे भारतीय टीम तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत.

पॉईंट्स टेबलमध्ये भारताच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत, पण पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स 38.88 आहेत. या कारणामुळे टीम इंडिया पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या मागे आहे. या दोन्ही टीमचे पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स 50 आहेत. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातली टेस्ट सीरिज 1-1 ने बरोबरीत सुटली.

भारत आणि इंग्लंड यांचे पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स बरोबरीत आहेत. दोन्ही टीममध्ये आतापर्यंत सीरिजच्या 3 टेस्ट झाल्या आहेत. यातल्या दोन टेस्टमध्ये दोन्ही टीमचा प्रत्येकी 1-1 विजय झाला आहे, तर एक सामना ड्रॉ झाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या नव्या नियमानुसार प्रत्येक टीमला विजय मिळाल्यावर 12 पॉईंट्स मिळतात, तर ड्रॉ मॅचला 4 पॉईंट्स दिले जातात. या नियमानुसार भारत आणि इंग्लंडचे 16-16 पॉईंट्स पाहिजे होते, पण ट्रेन्ट ब्रीजमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये दोन्ही टीमचे स्लो ओव्हर रेटमुळे 2-2 पॉईंट्स कापण्यात आले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातली चौथी टेस्ट आता 2 सप्टेंबरपासून ओव्हलमध्ये होणार आहे. या टेस्टमध्ये विजय मिळवून पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी दोन्ही टीमना उपलब्ध आहे.

First published:

Tags: India vs england, WTC ranking