वेलिंग्टन, 06 फेब्रुवारी: भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने 80 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टी-20 प्रकारातील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने भारताचा 49 धावांनी पराभव केला होता.
कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. दोघांनी आक्रमक सुरुवात केली. पण तिसऱ्याच षटकात रोहित बाद झाला. रोहितच्या जागी ऋषभ पंत मैदानात आला. शिखर-ऋषभ यांची जोडीने संघाचे अर्धशतक पूर्ण करुन दिले. त्यानंतर लॉकी फग्र्युसनने धवनला बाद केले. त्यापाठोपाठ ऋषभ आणि विजय शंकर हे दोघे बाद झाले. त्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 65 अशी झाली. मैदानावर असलेला धोनी आणि हार्दिक पांड्या काही कमाल करतील असे वाटले पण न्यूझीलंडच्या गोलंदाजीपुढे तेही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. 19व्या षटकात भारताचा 139 धावात ऑलआऊट झाला.
त्याआधी टिम सेईफर्टच्या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 20 षटकात 219 धावा केल्या. सेईफर्टने ७ चौकार आणि 6 षटकारांसह ४३ चेंडूत 84 धावांची खेळी केली.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण रोहित शर्माचा हा निर्णय चांगलाच महागात पडला. टिम सेईफर्ट आणि कॉलिन मुन्रो यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी चौकार आणि षटकारांची बरसात केली. सेईफर्ट आणि मुन्रो जोडीने पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. ही जोडी भारतासाठी धोकादायक ठरेल असे वाटत असताना कुणाल पांड्याने मुन्रो 34 धावांवर बाद केले. पण त्यानंतर देखील सेईफर्टने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. अखेर खलिल अहमद त्यांची विकेट घेतली. त्यानंतर न्यूझीलंडच्या मधळ्या फळीतील फलंदाजांनी संघाला 219 धावांपर्यंत मजल मारून दिली. कर्णधार केन विल्यम्सन 34 धावांचे योगदान दिले. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
Live अपडेट
- भारताचा 139 धावांवर ऑलआउट
- भारताची नववी विकेट, धोनी 39 धावांवर बाद
- 15 षटकात भारताच्या 6 बाद 113 धावा
- 10 षटकात भारताच्या 4 बाद 72 धावा
- 5 षटकात भारताच्या 1 बाद 46 धावा
- 3 षटकात भारताच्या 1 बाद 19 धावा
- भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा बाद
- भारताच्या डावाची सुरुवात, शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात
- 20 न्यूझीलंडच्या 6 बाद 219 धावा
- 18.4 षटकात न्यूझीलंडच्या 6 बाद 200 धावा
- 17 षटकात न्यूझीलंडच्या 4 बाद 180 धावा
- न्यूझीलंडला सलग दुसरा धक्का, केन विल्यम्सन बाद
- 15 षटकात न्यूझीलंडच्या 3 बाद 164 धावा
- न्यूझीलंडला तिसरा धक्का, दिनेश कार्तिकने घेतला धरारक कॅच; डॅरेल मिचेल 8 धावांवर बाद
- न्यूझीलंडला दुसरा धक्का, टिम सेईफर्ट 84 धावा करुन बाद
- 12 षटकात न्यूझीलंडच्या 1 बाद 127 धावा
- 10.3 षटकात न्यूझीलंडच्या 100 धावा
- 10 षटकात न्यूझीलंडच्या 1 बाद 97 धावा
- न्यूझीलंडची पहिली विकेट, कुणाल पांड्याने घेतली कॉलिन मुन्रोची विकेट
- टिम सेईफर्टची वादळी खेळी, 30 चेंडूत केल्या 50 धावा
- 8 षटकात न्यूझीलंडच्या शून्य बाद 85 धावा
- 6 षटकात न्यूझीलंडच्या शून्य बाद 50 धावा
- 4.4 षटकात न्यूझीलंडच्या 50 धावा
- कॉलिन मुन्रोची आक्रमक खेळी
- चौथ्या षटकानंतर न्यूझीलंड 0 बाद 44 धावा
- तिसऱ्या षटकात न्यूझीलंडने केल्या 15 धावा
- टिम सेईफर्ट आणि कॉलिन मुन्रो यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली