कोहलीच्या 'विराट' कामगिरीनंतरही भारताचा पराभव

कोहलीच्या 'विराट' कामगिरीनंतरही भारताचा पराभव

टॉम लेथमच्या झुंझार शतकामुळे न्यूझीलंडला टार्गेट गाठणं सोपं झालं. त्याआधी विराट कोहलीनं शानदार शतक ठोकलं होतं. भारताने 280चा विराट स्कोअर उभा केला.पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत 284 धावांचा डोंगर उभा केली आणि सामना खिशात घातला

  • Share this:

22 आॅक्टोबर : न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताचा पराभव झालाआहे. न्यूझीलंडनं ६ विकेट्स राखून भारताचा पराभव केला.

टॉम लेथमच्या झुंझार शतकामुळे न्यूझीलंडला टार्गेट गाठणं सोपं झालं. त्याआधी विराट कोहलीनं शानदार शतक ठोकलं होतं. भारताने 280चा विराट स्कोअर उभा केला.पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत 284 धावांचा डोंगर उभा केली आणि सामना खिशात घातला. तर दुसरीकडे गोलंदाजीमध्ये काल भारताकडून चमक दिसली नाही. ना विकेट्स घेता आले ना धावा रोखता आल्या. आता पुढची मॅच बुधवारी पुण्यात होणार आहे. तीनच सामन्यांची मालिका असल्याने पुढचे दोन्ही सामने जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे.

धावांचा पाऊस विराटच्या बॅटमधून इतका पडला की, या वर्षावात क्रिकेटप्रेमी भर दिवाळीत न्हाऊन निघाले.दिवाळीतली फटाक्यांच्या आतषबाजीची कसर विराटने भरून काढली आणि एका विक्रमाची नोंदही केली. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट आता मास्टरब्लास्टर सचिनच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. विराटनं एकदिवसीय सामन्यात एकतिसावं शतक झळकावलं आणि रिकी पाँटिंगला मागे टाकलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2017 07:59 PM IST

ताज्या बातम्या