World Cup 2019 : आयपीएलमुळं भारतीय संघाची गुपितं झालीत का लीक?

विश्वचषकाला केवळ 25 दिवस उरले असताना संघ बांधणीवरुन भारतीय संघ व्यवस्थापन आयपीएलवर नाराज झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 13, 2019 07:27 PM IST

World Cup 2019 : आयपीएलमुळं भारतीय संघाची गुपितं झालीत का लीक?

मुंबई, 13 मे : चेन्नईला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या षटकात मुंबईने एका धावेनं विजय साजरा केला.मुंबईने दिलेलं 150 धावांचं आव्हान चेन्नई सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने सामन्यावर पकड मिळवली. धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईचे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने टिच्चून गोलंदाजी केली. याच षटकात शेन वॉटसन धावबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करत मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला. याबरोबरच मुंबईनं इतिहास घडवला आणि सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. मात्र आता आयपीएल गाजवल्यानंतर आता सर्वांच लक्ष लागलं आहे ते, विश्वचषकाकडे.

मात्र, विश्वचषकाला केवळ 25 दिवस उरले असताना संघ बांधणीवरुन भारतीय संघ व्यवस्थापन आयपीएलवर नाराज झाला आहे. त्यातच आता परदेशी प्रशिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना आयपीएलमध्ये संधी दिल्यानं बीसीसीआयच्या नाराजीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये बहुतांश संघात प्रशिक्षक किंवा कर्मचारी स्थानावर परदेशी खेळाडू आहेत. म्हणजे दिल्ली कॅपिटल्स या संघात भारताचा सलामीवीर शिखर धवन खेळत असून, या संघाच्या प्रशिक्षकपदावर ऑस्ट्र्रेलियान संघाच्या सहप्रशिक्षक रिकी पॉंटिंग आहे. तर, दिल्लीचा संघ विश्लेषक श्रीराम सोमायाजुला हे श्रीलंकन क्रिकेट संघाचा विश्लेषक आहे. त्यामुळं अर्थातच या दोन्ही प्रशिक्षकांना धवनच्या कमकुवत बाजू आणि बलस्थान माहित आहे. त्यामुळं या गोष्टी विश्वचषकाच्या दृष्टीनं भारतीय संघाला महागात पडू शकतात.

वाचा- World Cup : आयपीएल गाजवणारे ‘हे’ 10 विदेशी खेळाडू आता उडवतील विराटची झोप

बीसीसीआयचे धोरण समान का नाही?

दरम्यान विश्वचषकाला अवघा महिन्याभराचा कालावधी उरला असताना, त्यातच परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यामुळं खेळाडूंच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. यातच दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार सौरव गांगुली यांन रिकी पॉंटिंग हा भारतीय संघाचा चांगला प्रशिक्षक होऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते. गांगुलीवर सध्या परस्पर हितसंबंधांचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांच्यावरही हा आरोप करण्यात आला होता. यावर माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयचेच कान धरले होते. जर द्रविड, गांगुली, तेंडुलकर यांच्यासारखे खेळाडू जर आयपीएलचा भाग नसतील तर नुकसान कोणाचं आहे? भारतीय संघाशी किंवा इतर कोणत्या संघाशी संलग्न असलेल्या भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी दिली नाही तर, त्यात खेळाडूंचे नुकसान आहे. यातच जर, भारतीय संघाच्या व्यवस्थापन टीममधले कर्मचारी जर आयपीएलमध्ये भाग घेऊ शकत नाहीत तर, विदेशी खेळाडूंसाठी सुध्दा हा नियम लागु असावा. यासाठी बीसीसीआयनं समान धोरण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळं पुढच्या आयपीएलच्या हंगामात बीसीसीआय हा नियम लागु करेल का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

वाचा- IPL 2019 : यंदाच्या हंगामात विदेशी खेळाडू 'हिट' तर, भारतीय खेळाडू 'फेल'

वाचा- MI vs CSK : ...म्हणून नीता अंबानी आणि रितीका यांनी पाहिला नाही मुंबईच्या विजयाचा ‘तो’ क्षण



VIDEO : राज ठाकरेंनी मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिला 'हा' सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2019 07:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close