Home /News /sport /

भारताच्या राणीचं जगावर राज्य, खेळाच्या विश्वात रचला नवा इतिहास

भारताच्या राणीचं जगावर राज्य, खेळाच्या विश्वात रचला नवा इतिहास

भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हीने वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार पटकावला.

    नवी दिल्ली, 31 जानेवारी : भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हीने वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार पटकावणारी ती जगातील पहिलीच हॉकी खेळाडू ठरली आहे. जगभरातील क्रीडा प्रेमींनी 20 दिवस मतदान केल्यानंतर गुरुवारी वर्ल्ड गेम्स ऑफ अॅथलीट म्हणून तिची घोषणा करण्यात आली. राणी रामपालने 1 लाख 99 हजार 477 मतांसह अॅथलीट ऑफ द इयरमध्ये बाजी मारली. जानेवारीमध्ये 20 दिवस यासाठी मतदान घेण्यता आलं होतं. क्रीडा प्रेमींनी केलेल्या या मतदान प्रक्रियेत एकूण 7 लाख 5 हजार 610 जणांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने राणीला वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे अभिनंदन केलं आहे. राणीनंतर युक्रेनचा कराटेपटू स्टेनिसलाव होरूना दुसऱ्या तर कॅनडाची पॉवरलिफ्टर रिया स्टिन तिसऱ्या क्रमांकावर राहिली. राणी रामपाल म्हणाली की, मी हा पुरस्कार हॉकीला अर्पण करते. हे सर्व यश हॉकी प्रेमी, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि इतर सर्व हितचिंतकांच्या सपोर्टमुळे  शक्य झाले. एफआयएचने माझे नामांकन केल्याबद्दल त्यांची आभारी आहे. सुपर ओव्हर म्हणजे डोक्याला ताप, ICC ने VIDEO शेअर करत घेतली फिरकी वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कारासाठी वेगवेगळ्या खेळातील 25 जणांची निवड करण्यात आली होती. एफआयएचने राणीच्या नावाची शिफारस केली होती. गेल्या वर्षी भारताने एफआयएच मालिका जिंकली होती. यामध्ये राणीला मालिकावीरचा बहुमान मिळाला होता. राणीच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलं होतं. 4 चेंडूत 4 धावा हव्या असताना रोहित स्टाइल षटकार, हरमनप्रीतचा VIDEO पाहिलात का?
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Hockey

    पुढील बातम्या