रोहित-विराटमध्ये वाद? शास्त्रींनी सांगितली 'अंदर की बात'

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याचं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही मान्य केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 11:08 AM IST

रोहित-विराटमध्ये वाद? शास्त्रींनी सांगितली 'अंदर की बात'

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही दोघांमध्ये मतभेद असल्याचं मान्य केलं आहे. मात्र, हे मतभेद त्यांच्या दृष्टीकोनात असून यामुळं दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा नसल्याचं स्पष्ट केलं. याआधी विंडीज दौऱ्यापूर्वी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत असं सांगितलं होतं.

रवी शास्त्री यांनी गल्फ न्यूजला सांगितलं की, संघात जेव्हा 15 खेळाडू असतात तेव्हा अनेकदा अशी वेळ येते की वेगवेगळा दृष्टीकोन असतो. त्याची गरज आहे. मला नाही वाटत सर्वांनी एकच मत मांडावं.

संघातील खेळाडूंमध्ये चर्चा व्हायला हवी. तरच कोणत्याही रणनितीवर विचार होऊ शकतो. त्यामुळं खेळाडुंना त्यांचं म्हणणं मांडायची संधी द्यायला हवी. त्यानंतर ठरवायला हवं की काय करायचं असं शास्त्री म्हणाले.

ज्यूनिअर खेळाडूसुद्धा काही चांगली रणनिती सांगतात. ज्याबद्दल इतर कोणीही विचार केलेला नसतो. त्यावर विचार करण्याची गरज आहे. त्यामुळं याकडे मतभेद म्हणून पाहता येणार नाही असं शास्त्रींनी सांगितलं.

भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाल्यानंतर शास्त्री म्हणाले की, जर कोहली आणि रोहित यांच्यात मतभेद असते तर वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा पाच शतक करू शकला नसता. गेल्या पाच वर्षांपासून मी त्यांच्यासोबत आहे. ते कसे खेळतात, संघ मजबूत कसा करत आहेत आणि त्यांना त्यांचं काम माहिती आहे. त्यामुळं त्यांच्यातील मतभेदांबद्दल चर्चा करणं निरर्थक आहे.

Loading...

'आरे'तील कारशेडला शिवसेनेचा 'ना रे'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...