कोहलीपेक्षा शास्त्रींचा पगार 'विराट', एका दिवसाला मिळतात इतके लाख!

कोहलीपेक्षा शास्त्रींचा पगार 'विराट', एका दिवसाला मिळतात इतके लाख!

मंदीच्या काळात भारताचे मुख्य प्रशिक्षक शास्त्रींना धनलाभ झाला असून विंडीज दौऱ्यानंतर त्यांना पगारवाढीची खूशखबर मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर : वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर भारतानं विंडीज दौऱ्यात तीनही मालिका जिंकल्या. याचं बक्षीस भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मिळणार आहे. त्यांच्या वेतनात 20 टक्के वाढ होणार आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार आता मुख्य प्रशिक्षकांना 9.5 ते 10 कोटी इतकं वार्षिक वेतन दिलं जाणार आहे. याआधी रवी शास्त्रींना वर्षाला 8 कोटी रुपये मिळत होते. पुढच्या दोन वर्षांपर्यंत शास्त्रींना ही वेतनवाढ मिळणार आहे. आता विराट कोहलीपेक्षा रवी शास्त्री यांना जास्त वेतन मिळतं. विराटला सात कोटी रुपये वर्षाला मिळतात.

रवि शास्त्री यांच्याशिवाय सपोर्ट स्टाफलासुद्धा वेतनवाढ देण्यात आली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक 3.5 कोटी रुपये देण्यात य़ेणार आहेत. तर विक्रम राठोड यांना 2.5 ते 3 कोटी रुपये मिळू शकतात.

बीसीसीआय रवी शास्त्रींना वार्षिक 10 कोटी रुपये दिल्यास त्यांना महिन्याला सरासरी 83 लाख इतकं वेतन मिळेल. यानुसार दिवसाचा हिशोब काढला तर त्यांना एका दिवसासाठी जवळपास 2 लाख 75 हजार रुपये मिळतात.

रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं विंडीजविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत एकही सामना न गमावता मालिका नावावर केली. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर भारताचा हा पहिलाच दौरा होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं विजय साजरा केला. आता दक्षिण आफ्रिका संघ 15 सप्टेंबरला भारत दौऱ्यावर येणार आहे.

रवी शास्त्रींनी म्हटलं आहे की, त्यांचं लक्ष्य युवा खेळाडूंना संधी देण्यासह विजयी मालिका कायम ठेवणं हे आहे. युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष ठेवताना फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत करण्यावर जोर देण्यात येईल. तसेच सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि पुढच्या वर्षी टी20 वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

VIDEO : पवारांना सांगा..,चंद्रकांत पाटलांचा बारामतीच्या सभेत टोला

Published by: Suraj Yadav
First published: September 9, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading