भारताच्या माजी हॉकीपट्टूचा फूटपाथवर जगण्याशी संघर्ष, क्रीडामंत्री आणि बिग बींकडून मदतीचा हात

भारताच्या माजी हॉकीपट्टूचा फूटपाथवर जगण्याशी संघर्ष, क्रीडामंत्री आणि बिग बींकडून मदतीचा हात

भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूवर फूटपाथवर राहण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : भारताचा माजी हॉकीपटू सध्या रस्त्यावर त्याचं आयुष्य जगत आहे. जेव्हा देशाकडून खेळत होता तेव्हा त्याला वाटलंही नसेल की आपल्याला असंही जीवन जगावं लागेल. दिल्लीच्या थंडीत रस्त्या कडेला आयुष्य जगण्याची वेळ आलेल्या या खेळाडूची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन मदतीला धावले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टनुसार अमरजीत सिंग भारतासकडून ज्युनिअर हॉकी खेळले आहेत. त्यांनी अॅथलेटिक्समध्येही भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर ओळख निर्माण केलेल्या या खेळाडूने लंडन आणि जर्मनीत वास्तव्य केलं. पण आता हा खेळाडू दिल्लीतील पहाड गंज परिसरात रस्त्याकडेला आयुष्य व्यतित करत आहे.

अमरजित सिंग कधीपासून इथं राहत आहे आणि कशामुळे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना जेव्हा या खेळाडूबद्दल ट्विटरवर माहिती मिळताच या माजी खेळाडूला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

रिजिजू यांनी ट्विटरवरून पोस्ट करत म्हटलं आहे की, मी ट्विटरवरून नेहमीच आवाहन करत असतो. जे कोणी भारतासाठी खेळलं आहे आणि सध्या जगण्याचा संघर्ष करत आहे त्यांना आर्थिक मदत केली जाईल. यांची माहिती मिळाली तर आम्ही नक्की मदत करू.

बॉलिवूड अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन  यांनीही ट्विट करून या माजी खेळाडूला मदत करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, संबंधित खेळाडूची माहिती मिळू शकेल का? त्यांना कुठे आणि कशी मदत करता येईल असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

'मुलीला आरती करताना पाहून भडकलो', रागाने TV फोडल्याचं आफ्रिदीने केलं मान्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hockey
First Published: Dec 30, 2019 01:01 PM IST

ताज्या बातम्या