सचिनने केलं अभिनंदन, हिमा म्हणाली एक स्वप्न पूर्ण झालं

सचिनने केलं अभिनंदन, हिमा म्हणाली एक स्वप्न पूर्ण झालं

भारताची धावपटू हिमा दासची सोनेरी घोडदौड़ सुरूच असून गेल्या 20 दिवसांत तिनं 5 सुवर्णपदकं पटकावली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जुलै : भारताची धावपटू हिमा दासने गेल्या 20 दिवसांत पाच सुवर्णपदकं पटकावली आहेत. तिच्या या यशानंतर देशभरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिमाला भारताचे राष्ट्रपति रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेसुद्धा हिमाला फोनवरून शुभेच्छा दिल्या. यानंतर हिमाने ट्वीट करून तिच्या भावना व्यक्त केल्या.

हिमा दास धावपटू असली तरी सचिनची मोठी चाहती आहे. सचिनकडूनच प्रेरणा मिळते असं ती नेहमीच म्हणते. सचिनने फोनवरून शुभेच्छा दिल्यानंतर हिमा दासने ट्विट केलं आहे. तिने म्हटलं आहे की, आज माझं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. क्रिकेटचा देव आणि माझं प्रेरणास्थान असलेल्या सचिने तेंडुलकर सरांचा फोन आला. तुमच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनासाठी आभारी आहे. मी माझं ध्येय गाठण्यात कोणतीही कमतरता ठेवणार नाही.

हिमाने शनिवारी 400 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. याआधी हिमाने चार सुवर्ण पटकावली होती. गेल्या 20 दिवसांत तिचं हे पाचवं सुवर्णपदक ठरलं. यातील चार सुवर्ण पदकं 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील आहेत. झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं 400 मीटर अंतर 52.09 सेकंदात पूर्ण केलं. हिमाची ही कामगिरी या हंगामातील सर्वोत्तम ठरली आहे. 2 जुलै रोजी तिनं पहिलं सुवर्ण पटकावलं. त्यानंतर सुवर्णपदकांचा धडाका तिनं कायम ठेवला आहे. यावर्षी तिला पाठदुखीमुळं आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं.

हिमाला कार चालकानं अर्ध्या रस्त्यात खाली उतरवलं होतं, शर्यतीत हरवून घेतला होता बदला

हिमाने पोलंडमध्ये पोजनान अॅथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो अॅथलेटिक्समध्येसुद्धा तिने आपली कामगिरी कायम राखली. 8 जुलैला झालेल्या स्पर्धेत हिमाने 23.97 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्ण पदकावर नावं कोरंल होतं. त्यानंतर क्लांदो मेमोरियल अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमानं 200 मीटर प्रकारात तिसरं सुवर्ण पटकावलं. हिमानं 200 मीटर अंतर 23.43 सेकंदात पार केलं. वर्ल्ड ज्यूनिअर चॅम्पियन असलेल्या आणि 400 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या हिमाची सर्वोत्तम वेळ 23.10 इतकी आहे. गेल्याच वर्षी तिनं ही वेळ नोंदवली होती. गेल्या वर्षभरापासून हिमा पाठदुखीने त्रस्त आहे. त्यातही तिने जबरदस्त कमबॅक करत आपली कामगिरी उंचावली आहे.

हिमाला कार चालकानं अर्ध्या रस्त्यात खाली उतरवलं होतं, शर्यतीत हरवून घेतला होता बदला

SPECIAL : शाब्बास हिमा...भारताच्या सुवर्ण कन्येचा गोल्डन पंच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Hima Das
First Published: Jul 22, 2019 08:20 AM IST

ताज्या बातम्या