भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांचं वृद्धापकाळानं निधन

भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 11:10 AM IST

भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांचं वृद्धापकाळानं निधन

मुंबई, 23 सप्टेंबर : भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. आपटे यांनी 1952 ते 53 या काळात 7 कसोटीत भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं.

माधव आपटे यांच्या क्रिकेट कारकिर्दीला गोलंदाज म्हणून सुरूवात झाली. 1948 मध्ये त्यांची क्रिकेट कारकिर्द सुरू झाली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना विनू मंकड यांच्याकडून आपटे यांनी गोलंदाजीचं प्रशिक्षण घेतलं होतं.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात माधव आपटे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी सात कसोटी सामन्यात 542 धावा केल्या होत्या. त्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना त्यांनी 67 सामन्यात 3 हजार 336 धावा केल्या.

आपटे यांनी 1950 च्या दशकात भारताकडून कसोटी सामने खेळले होते. यात त्यांनी 49.27 च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. त्यांनी 1953 मध्ये विंडीजविरुद्ध 1953 मध्ये 163 धावांची खेळी केली होती.

Loading...

VIDEO: आता पाकिस्तानची खैर नाही; भारत-अमेरिकेची दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 23, 2019 11:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...