मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Zim: भारतानं जिंकली नाणेफेक, झिम्बाब्वेला फलंदाजीचं निमंत्रण; पाहा अंतिम अकरात कुणाला स्थान?

Ind vs Zim: भारतानं जिंकली नाणेफेक, झिम्बाब्वेला फलंदाजीचं निमंत्रण; पाहा अंतिम अकरात कुणाला स्थान?

टीम इंडिया

टीम इंडिया

Ind vs Zim: भारत आणि झिम्बाब्वेमधील पहिली वन डे आज हरारे स्पोर्टस क्लबवर खेळवली जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Siddhesh Kanase
हरारे, 18 ऑगस्ट: भारत आणि झिम्बाब्वेमधील पहिली वन डे आज हरारे स्पोर्टस क्लबवर खेळवली जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ: लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, ईशान किशन, संजू सॅमसन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर दीपक चहर, राहुलचं पुनरागमन या वन डेच्या निमित्तानं टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुल आणि वेगनान गोलंदाज दीपक चहर तब्बल सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्यात दोघांनीही भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. पण त्यानंतर दुखापतीमुळे राहुल आणि दीपक चहरला इंग्लंड, आयर्लंड आणि विंडीज दौऱ्याला मुकावं लागलं होतं. पण झिम्बाब्वे दौऱ्य़ाआधी हे दोघंही फिट झाले. त्यामुळे निवड समितीनं आशिया चषकाआधी तयारीसाठी झिम्बाब्वेतील वन डे मालिकेसाठीच्या भारतीय संघात त्यांना स्थान दिलं आहे. भारताचा झिम्बाब्वे दौरा 18 ऑगस्ट – पहिली वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 20 ऑगस्ट – दुसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 22 ऑगस्ट – तिसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब मालिकेतले तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वा. सुरु होतील
First published:

Tags: Sports

पुढील बातम्या