टी20 सामन्यात भारताचा 'विराट' विजय

टी20 सामन्यात भारताचा 'विराट' विजय

विराट कोहलीनं सामन्याची सूत्र हातात घेतली आणि ८२ धावा फटकावल्या यामध्ये ७ चौके आणि एका षटकाराचा समावेश आहे. या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने श्रीलंकेचा पराभव केला

  • Share this:

07 सप्टेंबर: सलग 9 सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवत  'विराट' पराक्रम केला आहे श्रीलंका दौऱ्याचा शेवटही टीम इंडियाने विजयानं केलाय. हा एकमेव टी-२० सामना भारतानं ७ गडी राखून जिंकलाय.

पहिल्यांदा बॅटिंग करत श्रीलंकेने २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावत १७० धावा केल्या. भारताकडून चहलनं ३ तर कुलदीप यादवनं २ विकेट घेतल्या. १७१ धावांचा पाठलाग करतांना, ४२ धावांवर भारतानं २ विकेट्स गमावल्या त्यानंतर विराट कोहलीनं सामन्याची सूत्र हातात घेतली आणि ८२ धावा फटकावल्या यामध्ये ७ चौके आणि एका षटकाराचा समावेश आहे. या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने श्रीलंकेचा पराभव केला.

या मालिकेत 3 कसोटी,पाच वनडे आणि एक टी20  असे एकूण 9 सामने भारताने जिंकले आहेत.

First published: September 7, 2017, 9:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading