S M L

टी20 सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्मा भारताचं कर्णधारपद सांभाळतो आहे. आज नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 12, 2018 11:58 PM IST

टी20 सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

12 मार्च :भारत आणि श्रीलंका आणि बाँग्लादेश  दरम्यान होणाऱ्या निदास ट्रॉफी स्पर्धेतील    चौथ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेला मात दिली आहे.  सहा गडी राखून अगदी सहज हा सामना भारताने काबीज केला.

विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्मा भारताचं कर्णधारपद सांभाळतो आहे. आज नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या 9 गड्यांना तंबूत पाठवून भारताला श्रीलंकेला 152 धावांवर रोखण्यात यश आलं. हा सामना 19 षटकांचाच झाला. श्रीलंकेच्या एकाच खेळाडूने फक्त 55 धावा केल्या.  मनीष पांडे याने नाबाद 42 धावा तर दिनेश कार्तिकने 39 धावा केल्या आहेत. भारताने 17.3 षटकांमध्ये  सामना जिंकला. टी20 सामन्यात पहिली हिटविकेट के.एल.राहूल या खेळाडूची पडली.

आता उर्वरित सामने भारत जिंकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 11:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close