S M L

भारताकडून श्रीलंकेला व्हाईटवॉश 

शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ६ गडी राखून विजय मिळवला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 4, 2017 09:56 AM IST

भारताकडून श्रीलंकेला व्हाईटवॉश 

04 सप्टेंबर: टीम इंडियानं पाचव्या एकदिवसीय सामन्यासह मालिकाही आपल्या खिशात घातलीय. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ६ गडी राखून श्रीलंकेवर विजय मिळवला आहे.

कर्णधार विराट कोहलीनं आपलं ३०वं शतक झळकवत भारताला आणखी एक विजय मिळवून दिला आहे. तर केदार जाधवनं अर्धशतक झळकवलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेनं २३८ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारनं पाच विकेट्स घेत लंकेच्या फलंदाजीच कंबरडच मोडलं. थिरमानेच्या ६७ आणि मॅथ्यूजच्या ५५ धावा वगळता श्रीलंकेचे उर्वरीत फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. भारताची सुरुवातही डळमळीत झाली. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे लवकर बाद झाले. त्यानंतर विराट कोहलीनं किल्ला लढवत नाबाद ११० धावा केल्या. तर केदार जाधवने अर्धशतक झळकावत विराटला चांगली साथ दिली.

कसोटी मालिकेपाठोपाठ भारतानं एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व कायम ठेवत लंकेला व्हाईट वॉश दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 09:56 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close