सेंचुरियन एकदिवसीय सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

सेंचुरियन एकदिवसीय सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

तब्बल 9 गाडी राखत भारताने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आहे.

  • Share this:

04 फेब्रुवारी:  भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सेंचुरियन  इथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात  भारताने साऊथ आफ्रिकेचा धुव्वा उडवलाय. तब्बल 9 गाडी राखत भारताने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आहे.

आजच्या या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर यजुवेंद्र चहलने फक्त 22 धावा देत दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना तंबुत परत पाठवले.  तर कुलदीप यादवने 20 धावा देऊन 3 गडी बाद केले. या दोघांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची टीम118 वर ऑल आऊट झाली. श्रीलंकेचा संघ 50 षटकेही पूर्ण खेळू शकला नाही. त्यानंतर भारतीय फलंदजांनी सुरेख बॅटिंग करत 119 धावा  पूर्ण केल्या.शिखर धवनने 51 धावा केल्या तर विराट कोहलीने 46 धावा केल्या रोहित शर्मा मात्र 15 धावा काढून  बाद झाला.

सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी मिळवली आहे.  आता मालिका जिंकण्यासाठी भारताला अजून दोन सामने जिंकण गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2018 06:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading