अटीतटीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 6 धावांनी विजय

अटीतटीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 6 धावांनी विजय

या विजयामुळे भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहने 3 ,भुवनेश्वर कुमारने 1 तर यजुवेंद्र चहलने 2 विकेट घेतल्या. शेवटच्या दहा षटकात भारताने तीन विकेट्स घेत यश खेचून आणले.

  • Share this:

27 ऑक्टोबर: आज भारत-न्युझीलंडमध्ये झालेल्या निर्णयक सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ही मालिकाही आपल्या नावी केली आहे.

आज न्यूझीलंडने  टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय आज त्यांना चांगलाच महागात पडला. त्यात रोहित शर्मानं सेंच्युरी ठोकली. रोहित शर्मानं १४७ रन्स केलेत. तर विराट कोहलीनं ११३ रन्स केले. या दोघांच्या २३० रन्सच्या पार्टनर्शिपच्या जोरावर भारतानं ३०० रन्सचा टप्पा पार केला. पहिले फलंदाजी करत भारताने 337 धावांचा डोंगर उभा केला. तर न्युझीलंडला भारतीय गोलंदाजांनी 331 धावांवरच रोखले. या विजयामुळे भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहने 3 ,भुवनेश्वर कुमारने 1 तर यजुवेंद्र चहलने 2 विकेट घेतल्या. शेवटच्या दहा षटकात भारताने तीन विकेट्स घेत यश खेचून आणले.

या विजयामुळे आत विराट  कोहलीकडून देशाच्या कर्णधार म्हणून अपेक्षा उंचावल्या आहेत.

First published: October 29, 2017, 9:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading