वैतागलेल्या ऋषभ पंतने अभिनेत्रीला केलं ब्लॉक, गर्लफ्रेंडसोबतचा फोटो ठरला कारण?

वैतागलेल्या ऋषभ पंतने अभिनेत्रीला केलं ब्लॉक, गर्लफ्रेंडसोबतचा फोटो ठरला कारण?

भारताचा युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीला त्यानं ब्लॉक केल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जानेवारी : भारताचा युवा क्रिकेटपटू ऋषभ पंतला लंकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातून वगळण्यात आलं. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली. भारताने हा सामना 74 धावांनी जिंकला. पंतच्या खराब कामिगिरीमुळे त्याला फटका बसल्याचे म्हटलं जात आहे. मात्र सध्या पंत वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला पंतने त्याची गर्लफ्रेंड इशा नेगीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर एका अभिनेत्रीने त्याला सतत कॉल केल्यानं त्रासलेल्या पंतने तिला ब्लॉक करून टाकले आहे. याचे वृत्त इंग्रजी वेबसाइट स्पॉटबॉयने दिलं आहे.

भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंतने अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला ब्लॉक केलं आहे. उर्वशी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे पंतने तिला ब्लॉक केल्याचं म्हटलं जात आहे. याला अभिनेत्रीच्या व्यवस्थापकाने दुजोरा दिला आहे.

स्पॉटबॉयनुसार उर्वशी आणि ऋषभ यांचे नाव एकमेकांशी जोडल्याची चर्चा होती. पण न्यू इयरच्या निमित्ताने ऋषभ पंतने गर्लफ्रेंड इशा नेगीसोबतचा फोटो पोस्ट करून सगळ्या अफवा हवेत विरल्या. यानंतर दोघांनीही एकमेकांना फोन कॉल आणि व्हॉटसअॅपवर ब्लॉक केलं आहे.

View this post on Instagram

I like me better when I’m with you ‍♂

A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on

पंतच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी पंतला सतत कॉल करत होती. अभिनेत्रीच्या मॅनेजरने दोघांनी एकमेकांना ब्लॉक केल्याचं म्हटलं आहे. याआधी उर्वशी रौतेलाचे नाव हार्दिक पांड्याशी जोडले गेले होते. हार्दिक पांड्याने काही दिवसांपूर्वी दुबईत गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविच हिच्याशी साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर त्याने फोटो शेअर करून ही बातमी सर्वांना सांगितली होती.

दरम्यान, ऋषभ पंतला लंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातून वगळल्याने एकप्रकारे त्याला इशाराच देण्यात आला आहे. वर्ल्ड कपनंतर यष्टीरक्षणाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर देण्यात आली होती. यावेळी मधल्या फळीत फलंदाजी करण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते. मात्र, पंत फलंदाजीत चमक दाखवू शकला नाही. कामगिरीत सातत्य राखता न आल्याने त्याच्याऐवजी संजू सॅमसनला संधी दिल्याचे म्हटलं जात आहे.

अजिंक्य रहाणेनं शेअर केला वडापावसोबत फोटो, सचिननं ‘मुंबईकर’ स्टाईल दिले उत्तर

Published by: Suraj Yadav
First published: January 11, 2020, 8:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading