सचिनप्रमाणेच धोनीने करायला हवं, माजी निवड समिती सदस्यांचा सल्ला

सचिनप्रमाणेच धोनीने करायला हवं, माजी निवड समिती सदस्यांचा सल्ला

धोनीला नावं ठेवणाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत नीट खेळता आलं नाही असं म्हणत भारतीय संघाच्या निवड समितीच्या माजी सदस्यांनी त्याची पाठराखण केली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : भारतीय क्रिकेट संघासमोर सध्या मोठा प्रश्न आहे तो म्हणजे धोनीचा. धोनीची कामगिरी आणि त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु असली तरी त्याला सक्षम असा पर्याय सध्या संघाकडे नाही. त्यामुळे वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार की नाही? तो निवृत्ती घेणार का? यावर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान माजी निवड अधिकारी संजय जगदाळे यांनी धोनीची बाजू घेतली आहे. ते म्हणाले की, सध्या भारतीय संघाला धोनीला पर्याय नाही आणि त्याला त्याच्या निवृत्तीचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

धोनीच्या संथ खेळीवरून अनेकांनी टीका केली आहे. त्याबद्दल जगदाळे म्हणाले की, आज जे क्रिकेटपटू धोनीवर टीका करत आहेत त्यांना स्वत:ला किती खेळता आलं. धोनी महान खेळाडू असून तो निस्वार्थी वृत्तीनं देशासाठी खेळत आला आहे.

धोनीने निवड समितीची भेट घेऊन त्याच्या योजना काय आहेत याची माहिती द्यायला हवी. ज्या पद्धतीने सचिनने त्याच्या भविष्याबद्दल सांगितलं होतं तसं धोनीने सांगायला हवं असंही जगदाळे यांनी म्हटलं.

वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या संथ खेळीवर अनेकांनी टीका केली. त्यावरही जगदाळेंनी धोनीचं समर्थन केलं. धोनीनं वर्ल्ड कपमध्ये संघाच्या गरजेनुसार फलंदाजी केली, सेमीफायनलमध्येसुद्धा रणनीतिनुसारच खेळला. पण मोक्याच्या क्षणी धावबाद झाल्यानं सामना फिरला. आता जे टीका करत आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तरी नीट खेळता आलं का? असा प्रश्न जगदाळे यांनी विचारला आहे.

'वर्ल्ड कप भारताला मिळायला हवा', हे मजेशीर कारण वाचलंत का?

VIDEO: 'गर्दी झाली म्हणून पाहायला गेलो अन् समोर भाऊच रक्ताच्या थारोळ्यात होता'

First published: July 20, 2019, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading