टी-20 वर्ल्ड कपआधी होणार भारत-पाक सामना, असा आहे ICCचा प्लॅन

टी-20 वर्ल्ड कपआधी होणार भारत-पाक सामना, असा आहे ICCचा प्लॅन

ऑस्ट्रेलियात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा जेव्हा सामना झाला आहे, त्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. जर, या दोन देशांमध्ये वर्ल्ड कप साऱ्या स्पर्धेत सामने होत असतील तर चाहत्यांचा जोश वेगळाच असतो. त्यामुळं फक्त चाहतेच नाही तर आयसीसीच्या वतीनंही अशा स्पर्धांमध्ये भारत-पाक सामने आयोजित केले जातात.

त्यामुळं आयसीसीच्या वतीनं ऑस्ट्रेलियात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधी एक सामना आयोजित करण्यात येणार आहे. यात भारत-पाकिस्तान यांचा सामना होणार असल्याचे काही मिडीया रिपोर्टनुसार स्पष्ट झाले आहे. दरम्यान भारत-पाक हे दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये खेळतात. दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये सामने खेळले आहेत. 26/11नंतर भारत-पाकमध्ये एकही सामना झालेला नाही.

वर्ल्ड कप टी-20च्या सराव सामन्यात भिडणार भारत-पाक

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, आयसीसी टी-20 वर्ल्ड कपआधी भारत-पाकमध्ये सराव सामना होणार आहे. कारण आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांमध्ये आहेत. त्यामुळं आयसीसीच्या वतीनं चाहत्यांसाठी भारत-पाक यांच्यात सराव सामना आयोजित करण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धांमध्ये 2012पासून एका ग्रुपमध्ये राहिले नाही आहेत. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 क्रिकेट वर्ल्ड कप रॉबीन राऊंड पध्दतीनं खेळले गेले. याआधी 2009 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकमध्ये सराव सामना झाला होता. अद्याप यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक सराव सामन्यासाठी बीसीसीआयनं परवानगी दिलेली नाही.

असे आहेत दोन ग्रुप

ग्रुप 1- पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ग्रुप A विजेता, ग्रुप B उप-विजेता

ग्रुप 2- भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ग्रुप A उप-विजेता, ग्रुप B विजेता

असे असतील भारताचे सामने

ऑक्टोबर 24-भारत vs दक्षिण अफ्रीका (पर्थ स्टेडियम)

ऑक्टोबर 29- भारत vs क्वालिफायर ए-2 (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)

नोव्हेंबर 1- भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)

नोव्हेंबर 5 - भारत vs क्वालिफायर बी-1 (एडिलेड ओव्हल)

नोव्हेंबर 8- भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: October 16, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading