स्पोर्ट्स

  • associate partner

भारत-चीन संघर्षाचा IPL ला फटका, ‘या’ कारणामुळं होऊ शकतो कोट्यवधींचा तोटा

भारत-चीन संघर्षाचा IPL ला फटका, ‘या’ कारणामुळं होऊ शकतो कोट्यवधींचा तोटा

भारत आणि चीन (India China Clash) यांच्यातील सीमा वादाचा परिणाम आता भारतीय क्रिकेटवरही होऊ शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : भारत आणि चीन (India China Clash) यांच्यातील सीमा वादाचा परिणाम आता भारतीय क्रिकेटवरही होऊ शकतो. गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. यानंतर आता चिनी सामानावर बहिष्कार (Boycott China) घालण्याची मागणी जोर धरत आहे. याचा थेट परिणाम क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2020)वर होणार आहे.याचे कारण आहे स्पॉन्सरशिप.

VIVO आहे आयपीएलचे स्पॉन्सर

आयपीएलचा शीर्षक प्रायोजक चिनी स्मार्टफोन कंपनी विव्हो (Vivo) आहे. एवढेच नाही तर या कंपनीने स्पर्धेदरम्यान सर्वाधिक जाहिरात देखील करते. चिनी कंपनीने 2018 मध्ये पाच वर्षांसाठी 2199 कोटी रुपयांमध्ये करार केला. यंदा अद्याप आयपीएलच्या हंगामाचे आयोजन करण्यात आलेले नाही आहे. मात्र चिनी वस्तुंना बॅन केल्यास बीसीसीआयलाही प्रायोजक म्हणून दुसऱ्या कंपनीशी करार करावा लागेल.

वाचा-चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग

बीसीसीआय लवकरच घेणार निर्णय

सौरव गांगुली यांनी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रात लवकरच आयपीएलबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आयसीसीनं नुकत्याच घेतलेल्या बैठकीत टी-20 वर्ल्ड कपबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. त्यामुळं आयपीएल स्पर्धा आयोजित केल्यास कोणत्या महिन्यात होईल, याबाबत संभ्रम मात्र कायम आहे. सध्या बीसीसीआयची अपेक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, भारतात स्पर्धेचे आयोजन न झाल्यास श्रीलंका किंवा युएईमध्ये स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. या दोन्ही देशांकडून बीसीसीआयला निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

वाचा-CSK संघातील 'या' व्यक्तीनं शहीद जवानांचा केला अपमान

असा असेल प्लॅन

सरकारच्या वतीनं परदेशी विमानांना बंदी घातली असल्यामुळं परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत. त्यामुळं केवळ भारतीय खेळाडू या स्पर्धेत सामिल होती. तसेच, स्पर्धा कमीत कमी दिवसांसाठी आयोजित केली जाईल. त्याचबरोबर एक ते दोन मैदानावरच स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. आयपीएल फ्रँचायझीसोबती बीसीसीआय चर्चा करत आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ म्हणतात की बीसीसीआय ऑपरेशन टीम आयपीएल आयोजित करण्याच्या योजनेवर सर्व पर्यायांचा विचार करून काम करीत आहे.

वाचा-मुलगा शहीद झाल्याच्या वृत्ताने कुटुंबावर शोककळा, दुसऱ्याच दिवशी जवानाचा आला फोन

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 18, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या