मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL: श्रीलंकेला हरवून Team India मोडणार पाकिस्तानचा World Record!

IND vs SL: श्रीलंकेला हरवून Team India मोडणार पाकिस्तानचा World Record!

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 18 जुलैपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे ही सीरिज 5 दिवस उशीरा सुरू होत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 18 जुलैपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे ही सीरिज 5 दिवस उशीरा सुरू होत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 18 जुलैपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे ही सीरिज 5 दिवस उशीरा सुरू होत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 14 जुलै: भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 18 जुलैपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे ही सीरिज 5 दिवस उशीरा सुरू होत आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) टीमचा कर्णधार असेल. तसंच या दौऱ्यात भारताने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. भारतीय टीम 3 वनडे मॅचच्या या सीरिजमधल्या 2 मॅच जिंकली, तर पाकिस्तानचा विक्रम मोडला जाईल. या दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे आणि टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे.

भारताने श्रीलंकेत दोन मॅच जिंकल्या तर तिन्ही फॉरमॅटमध्ये श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होईल. सध्या हे रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध एकूण 125 मॅच जिंकल्या आहेत, तर भारताने 124 सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं आहे.

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 231 (टेस्ट, वनडे आणि टी20) मॅच खेळल्या आहेत. या यादीत भारत 222 मॅचसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध 154 मॅच खेळल्या आहेत. विजयी टक्केवारीमध्ये मात्र ऑस्ट्रेलियन टीम सगळ्यात पुढे आहे. ऑस्ट्रेलियाने 144 मॅचपैकी 88 मॅचमध्ये श्रीलंकेला धूळ चारली, म्हणजेच त्यांची विजयी टक्केवारी 61.11 एवढी आहे. ऑस्ट्रेलियाला 44 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर 8 मॅच ड्रॉ झाल्या.

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी-20 मिळून 222 मॅच खेळल्या, यातल्या 124 मॅचमध्ये भारताचा विजय झाला. भारताची विजयी टक्केवारी 55.85 एवढी आहे. श्रीलंकेने 68 सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला, तर एक मॅच टाय आणि 17 मॅच ड्रॉ झाल्या.

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 231 सामने खेळले, यापैकी 125 मॅचमध्ये पाकिस्तानला विजय मिळवला, म्हणजेच त्यांची विजयी टक्केवारी 54.11 एवढी आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 82 मॅच गमावल्या, एक मॅच टाय आणि 19 मुकाबले ड्रॉ झाले.

भारताने श्रीलंकेविरुद्ध एकूण 159 वनडे खेळल्या, यातल्या 91 मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर 56 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 57 टक्के वनडे जिंकल्या आहेत. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 155 सामन्यांपैकी 92 जिंकले. या यादीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. कांगारू टीीमने लंकेविरुद्ध 97 पैकी 61 वनडे जिंकल्या. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 62 एवढी आहे.

श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्या टॉप-5 क्रिकेटपटूंमध्ये सध्या खेळत असणारा विराट कोहली हा एकमेव आहे. विराटने 63 सामन्यांमध्ये 3,563 रन केले, यात 13 शतकांचा समावेश आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 5,108 रनसह पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने श्रीलंकेविरुद्ध 17 शतकं केली होती.

श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने 84 वनडेमध्ये 3,113 रन केले. दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी (MS Dhoni) आहे, त्याने 2,383 रन केले. तर विराट 2,220 रनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 7 सामन्यांमध्ये सर्वाधिक 339 रन केले आहेत.

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन आहेत. धवनने लंकेविरुद्ध 9 सामन्यांमध्ये 289 रन केले, यानंतर मनिष पांडेने (Manish Pandey) 7 मॅचमध्ये 226 रन केले. धवनने 16 वनडेमध्ये 983 रन केले आहेत.

First published:

Tags: Cricket, India Vs Sri lanka, Sports, Sri lanka