मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asian Champions Trophy, IND vs PAK : भारताने पाकिस्तानला चारली धूळ, रोमांचक सामन्यात जिंकलं ब्रॉन्झ

Asian Champions Trophy, IND vs PAK : भारताने पाकिस्तानला चारली धूळ, रोमांचक सामन्यात जिंकलं ब्रॉन्झ

भारतीय हॉकी टीमने धमाकेदार कामगिरी करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy) पाकिस्तानचा (India vs Pakistan) 4-3 ने पराभव केला आहे, याचसोबत भारताला स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे.

  • Published by:  Shreyas

ढाका, 22 डिसेंबर : भारतीय हॉकी टीमने धमाकेदार कामगिरी करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy) पाकिस्तानचा (India vs Pakistan) 4-3 ने पराभव केला आहे, याचसोबत भारताला स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. ढाक्यामध्ये झालेल्या या रोमांचक सामन्यात हाफ टाईमपर्यंत भारताचा स्कोअर 1-1 ने बरोबरीत होता, पण अखेरच्या दोन क्वार्टरमध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. भारताकडून मनप्रीत सिंग, सुमित, वरुण कुमार आणि आकाशदिप सिंग यांनी गोल केले, तर पाकिस्तानकडून अब्दुल राणा, अफराज आणि अहमद नदीम यांना गोल करण्यात यश आलं.

भारताने या मॅचमध्ये आक्रमक सुरुवात केली आणि एका मिनिटामध्येच 3 पेनल्टी कॉर्नर मिळवले. मनप्रीत सिंगने मॅचच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून गोल मारला आणि भारताला आघाडी मिळवून दिली. पाकिस्ताननेही पहिला क्वार्टर संपण्याच्याआधी गोल करत स्कोअर 1-1 ने बरोबरीत आणला. पाकिस्तानसाठी हा गोल अफराजने केला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये कोणालाही गोल करता आला नाही, त्यामुळे हाफ टाईमपर्यंत स्कोअर 1-1 असाच राहिला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ही संधी अब्दुल राणाने सोडली नाही, ज्यामुळे पाकिस्तानला 2-1 ने आघाडी मिळाली. सुमितने तिसरा क्वार्टर संपण्याच्या आधी भारताला बरोबरी करून दिली.

चौथ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या जुनैदला 2 मिनिटांसाठी बाहेर जावं लागलं, तेव्हा भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण याचं रुपांतर टीमला गोलमध्ये करता आलं नाही. यानंतर वरुण कुमारने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि भारताला 3-2 ने पुढे नेलं. पुढे आकाशदीप सिंगने गोल करत स्कोअर 4-2 पर्यंत नेला. पाकिस्तानच्या अहमद नदीमने तिसरा गोल केला, पण अखेर भारताने 4-3 ने हा सामना जिंकला.

भारतीय टीम यावेळी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाची दावेदार मानली जात होती, पण सेमी फायनलमध्ये जपानने भारताचा 5-3 ने पराभव केला. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमने ग्रुप गेमध्ये जपानचा 6-0 ने पराभव केला होता, पण सेमी फायनलमध्ये भारताला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.

First published: