मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 3rd T20 : रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचा धमाका, तिसरा सामना जिंकत किवी व्हाईट वॉश!

IND vs NZ 3rd T20 : रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचा धमाका, तिसरा सामना जिंकत किवी व्हाईट वॉश!

Photo-BCCI

Photo-BCCI

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातही टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) 73 रनने दणदणीत विजय झाला आहे, याचसह भारताने 3 टी-20 मॅचची सीरिज 3-0 ने जिंकत न्यूझीलंडला व्हाईट वॉश केलं आहे.

  • Published by:  Shreyas

कोलकाता, 21 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातही टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) 73 रनने दणदणीत विजय झाला आहे, याचसह भारताने 3 टी-20 मॅचची सीरिज 3-0 ने जिंकत न्यूझीलंडला व्हाईट वॉश केलं आहे. भारताने दिलेल्या 185 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 111 रनवर ऑल आऊट झाला. अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये फक्त 9 रन देत 3 विकेट घेतल्या. तर हर्षल पटेलला 2 आणि दीपक चहर, युझवेंद्र चहल, व्यंकटेश अय्यरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टीलने 36 बॉलमध्ये 51 रन केले. गप्टीलशिवाय दुसऱ्या कोणत्याही न्यूझीलंडच्या बॅटरला मोठा स्कोअर करता आला नाही.

टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 184 रन केले. नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या दीपक चहरने (Deepak Chahar) शेवटच्या ओव्हरमध्ये 19 रन काढले, त्यामुळे भारताला या स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. दीपक चहरने 8 बॉलमध्ये नाबाद 21 रनची खेळी केली, यामध्ये 2 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माने 31 बॉलमध्ये 56 रन केले. रोहितने ईशान किशनसोबत 6.2 ओव्हरमध्ये 69 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली, पण यानंतर सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत अपयशी ठरले. श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनाही मोठा स्कोअर करता आला नाही. श्रेयस अय्यर 25 रनवर आणि व्यंकटेस अय्यर 20 रनवर आऊट झाले. हर्षल पटेलनेही 11 बॉलमध्ये 18 रन करून भारताला 180 रनच्या पुढे न्यायला मदत केली. न्यूझीलंडकडून मिचेल सॅन्टनरला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. ट्रेन्ट बोल्ट, एडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन आणि ईश सोढी यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

या सामन्यात रोहितने आश्चर्यकारकरित्या टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या दिवसांमध्ये भारतात रात्रीच्या वेळी धुकं पडतं, त्यामुळे बॉल ओला होतो आणि बॉलर्ससाठी बॉल ग्रिप करणं कठीण असतं, त्यामुळे बहुतेकवेळा कर्णधार टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतात. रोहितनेही पहिल्या दोन्ही सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगच घेतली होती, पण सीरिजचा निर्णय आधीच भारताच्या बाजूने लागल्यामुळे तसंच बॉलर्सना या वातावरणात बॉलिंगचा सराव व्हावा म्हणून रोहितने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले. केएल राहुल (KL Rahul) आणि आर.अश्विन (R Ashwin) यांना विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांऐवजी ईशान किशन (Ishan Kishan) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांना संधी देण्यात आली. केएल राहुल हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, मागच्या 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राहुलने 4 अर्धशतकं केली आहेत, तर अश्विनने टी-20 वर्ल्ड कपमधून या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केलंय. राहुल आणि अश्विन यांना यानंतर दोन टेस्ट मॅचची सीरिजही खेळायची आहे, त्यामुळे त्यांना विश्रांती देण्यात येत आहे.

दुसरीकडे पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार असलेला न्यूझीलंडचा टीम साऊदी या सामन्यात खेळत नाहीये, त्याच्याऐवजी मिचेल सॅण्टनरकडे किवी टीमचं नेतृत्व देण्यात आलं.

First published: