Elec-widget

CWG 2018: भारताची 10 सुवर्णपदकांची कमाई, बॅडमिंटन संघानेही पटकावले सुवर्णपदक

CWG 2018: भारताची 10 सुवर्णपदकांची कमाई, बॅडमिंटन संघानेही पटकावले सुवर्णपदक

सायनाने चौथ्या सामन्यात मलेशियन खेळाडूला 21-11, 19-21 आणि 21-9 असा पराभव केला. भारताचं काॅमनवेल्थ गेम्समध्ये हे दहावं सुवर्णपदक आहे.

  • Share this:

आॅस्ट्रेलिया, 09 एप्रिल : काॅमनवेल्थ गेम्समध्ये भारताची सुवर्ण घौडदौड कायम आहे.  भारताच्या पारड्यात आज आणखी सुवर्णपदकाची भर पडलीये. मिक्स टीम बॅडमिंटनमध्ये भारताने पहिल्यांदाच काॅमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या टीमने मलेशियाचा 3-1 ने पराभव केलाय.

सायनाने चौथ्या सामन्यात मलेशियन खेळाडूला 21-11, 19-21 आणि 21-9 असा पराभव केला. भारताचं काॅमनवेल्थ गेम्समध्ये हे दहावं सुवर्णपदक आहे.

भारताच्या सुवर्णपदकाच्या कमाईची सुरुवात रेनकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी करून दिली. दुहेरीमध्ये रेनकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी पेंग सूल चान आणि लियु यिंग गोहचा 21-14, 15-21, 21-15 ने पराभव केला. त्यानंतर  श्रीकांतने ओलंम्पिक रौप्यपदक विजेत्या चोंग वेईचा 21-17, 21-14 ने पराभव करून सर्वांना धक्का दिला. ली चोंगवर श्रीकांतचा हा पहिला विजय होता. त्यानंतर सायना नेहवालने चौथ्या सामन्यात मलेशियन खेळाडून सोनियाचा 21-11,19-11 आणि 21-9 ने पराभव करून सुवर्णपदक पटकावले.

पुरुष टेबल टेनिस टीमनेही पटकावले सुवर्णपदक

भारतीय पुरूष टेनिस टीमनेही 21 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत नायजिरियाचा 3-0 ने पराभव केला. भारतीय महिला टीमने काल सिंगापूरचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले होते. आज पुरूष टीमने सेमीफायनलमध्ये सिंगापूरचा 3-2 ने पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2018 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...