Home /News /sport /

IND vs IRE 1st T20 : टीम इंडियाने 9 ओव्हरमध्येच संपवली मॅच, आयर्लंडचा धुव्वा

IND vs IRE 1st T20 : टीम इंडियाने 9 ओव्हरमध्येच संपवली मॅच, आयर्लंडचा धुव्वा

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचा (India vs Ireland 1st T20) 7 विकेटने विजय झाला आहे. आयर्लंडने दिलेलं 109 रनचं आव्हान भारताने 9.2 ओव्हरमध्येच पार केलं. दीपक हुड्डा (Deepak Hooda) 29 बॉलमध्ये 47 रनवर नाबाद राहिला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जून : आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचा (India vs Ireland 1st T20)  7 विकेटने विजय झाला आहे. आयर्लंडने दिलेलं 109 रनचं आव्हान भारताने 9.2 ओव्हरमध्येच पार केलं. दीपक हुड्डा (Deepak Hooda) 29 बॉलमध्ये 47 रनवर नाबाद राहिला, यात त्याने 6 फोर आणि 2 सिक्स मारले. इशान किशनने (Ishan Kishan) 11 बॉलमध्ये 26 आणि हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 12 बॉलमध्ये 24 रन केले. पावसामुळे हा सामना प्रत्येकी 12-12 ओव्हरचाच झाला. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती. टॉस झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाल्यामुळे मॅच सुरू व्हायला उशीर झाला. यानंतर आयर्लंडने 12 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 108 रन केले. हॅरी टेक्टरने 33 बॉलमध्ये नाबाद 64 रनची खेळी केली. यात 3 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. याशिवाय टकरनेही 18 रन केले. भारताकडून भुवनेश्वर, हार्दिक, आवेश आणि चहल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या उमरान मलिकला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या 2 टी-20 मॅचच्या सीरिजची दुसरी मॅच मंगळवारी होणार आहे. या सामन्यातही विजय मिळवून टीम इंडिया आयर्लंडला व्हाईट वॉश करण्यासाठी मैदानात उतरेल. भारताचे सीनियर खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे या सीरिजसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india

    पुढील बातम्या