रो'हिट'वादळापुढे इंग्लंडची धुळदाण,भारताने मालिका जिंकली

भारताने 18.4 षटकात विजयी मिळवला. भारतानं इंग्लंडसोबतची टी 20 मालिका 2-1नं जिंकली.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2018 10:32 PM IST

रो'हिट'वादळापुढे इंग्लंडची धुळदाण,भारताने मालिका जिंकली

08 जुलै : रोहित शर्माच्या तडाखेबाज नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडचा टी 20 सामन्यात धुव्वा उडवत मालिका खिश्यात घातलीये. भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात  इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला.

भारताने टाॅस जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. इंग्लंडनं निर्धारीत 20 षटकात भारताला विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडकडून

जेसन रॉय  67, जोस बटलर  34, एलेक्‍स हेल्‍स  30 आणि जॉनी बेयरस्‍टोने 25 धावाची खेळी कून 198 धावांचा टप्पा गाठला.

पण ब्रिस्टॉलच्या मैदानात 'हिटमॅन'चं रोहितचं वादळ आलं.  रोहित शर्माच्या झंझावती शतकाच्या जोरावर भारतानं हे आव्हान लीलया पार केलं. रोहितनं नाबाद 100 धावा केल्या. रोहितने 56 चेंडूत 11 चौकार आणि पाच षटकार लगावले.रोहितला विराट कोहली 43 आणि हार्दिक पांड्यानं फक्त 14 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार लगावून 32 धावा कुटल्यात. भारताने 18.4 षटकात विजयी मिळवला.

भारतानं इंग्लंडसोबतची टी 20 मालिका 2-1नं जिंकली.

हेही वाचा

गांधीजींमुळे इंग्रज निघून गेले,असं नाही-सुमित्रा महाजन

 तिलारी घाटात कार दरीत कोसळली, 5 तरुणाचा जागीच मृत्यू

 VIDEO :एसटीचा प्रवास ठरला अखेरचा,बसखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू

ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 10:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close