बंगळुरू, 15 जून : आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात अफगानिस्तानला भारताकडून 262 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अफगानिस्तान टीम दुसऱ्या दिवशी भारतसमोर टिकू शकली नाही.
भारताने पहिल्या इनिंगमध्ये शिखर धवन 107, मुरली विजय 105, हार्दिक पांड्या 71 आणि केएल राहुलने 54 धावांची शानदार खेळी करून भारताने 474 धावांचा डोंगर उभा केला.
दुसऱ्या दिवशी अफगानिस्तानला दुसऱ्या सत्रात पहिली खेळी करण्याचा संधी मिळाली पण 27.5 षटकात 109 धावांवर गारद झाली. भारताने पहिल्या इनिंगच्या आधारावर 365 धावांनी आघाडी घेतली. त्यामुळे यजमान टीमवर फाॅलोअॅनची वेळ आली.
मोठं आव्हान घेऊन उतरलेल्या अफगान टीमचा भारतीय गोलंदाजासमोर निभाव लागू शकला नाही. 38.4 षटकात 103 धावांवर ढेर झाली.
भारताला या कसोटीत दुसऱ्याच दिवशी विजय मिळाला. हा भारताचा पहिलाच विजय आहे. याआधी भारताने कसोटीत कधीच दुसऱ्या दिवशी विजय मिळवला नाही.
दुसऱ्या इनिंगमध्ये अफगानिस्तानकडून हशमातुल्लाहने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर कर्णधार असगर स्टेनेकज़ाईने 25 धावा केल्यात.
भारताकडून रवींद्र जडेजाने चार गडी बाद केले तर उमेश यादव तीन आणि ईशांत शर्माने दोन गडी बाद केले. आर आश्विनने एक गडी बाद केला.