मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Asia Cup 2022: विराटचं शतक, भुवीची कमाल; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 'विराट' विजय

Asia Cup 2022: विराटचं शतक, भुवीची कमाल; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 'विराट' विजय

अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा मोठा विजय

अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा मोठा विजय

Asia Cup 2022: टीम इंडियानं अफगाणिस्तानविरुद्धची सुपर फोर फेरीतली औपचारिक लढत 101 धावांनी जिंकून आशिया चषकात विजयी सांगता केली. आधी माजी कर्णधार विराट कोहलीचं नाबाद शतक आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या पाच विकेट्स हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दुबई, 08 सप्टेंबर: टीम इंडियानं अफगाणिस्तानविरुद्धची सुपर फोर फेरीतली औपचारिक लढत 101 धावांनी जिंकून आशिया चषकात विजयी सांगता केली. आधी माजी कर्णधार विराट कोहलीचं नाबाद शतक आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या पाच विकेट्स हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. टीम इंडियाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी टीम इंंडियासाठी हा विजय खास ठरला. या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानसमोर 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 षटकात 8 बाद 111 धावाच करता आल्या. भुवनेश्वर कुमारच्या प्रभावी माऱ्यासमोर एकवेळ अफगाणिस्ताची अवस्था 6 बाद 21 अशी झाली होती. पण त्यानंतर इब्राहिम झादराननं एक खिंड लावून धरल्यानं अफगाणिस्ताननं पूर्ण 20 षटकं खेळून काढली. झादराननं 59 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या.

भुवनेश्वरसमोर अफगाणिस्तानची दाणादाण

203 धावांच्या आव्हान समोर असताना अफगाणिस्तानची पहिल्या ओव्हरपासूनच दाणादाण उडाली. भुवनेश्वर कुमारनं आपल्या स्विंगच्या जाळ्यात पहिल्याच षटकात 2 फलंदाजांना अडकवलं. झाजाई आणि गुरबाज ही सलामीची जोडी पहिल्याच षटकात बाद झाली. त्यानंतर भुवीनं आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये करीम जन्नत आणि नजीबुल्ला झादरानला माघारी धाडलं. त्यानंतर ओमरझाईला बाद करुन भुवीनं टी20 कारकीर्दीतली आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली. भुवनेश्वरनं आपल्या 4 ओव्हरमध्ये एक मेडन ओव्हर टाकत अवघ्या 4 धावात 5 विकेट्स काढल्या. याशिवाय अर्शदीप सिंग, दीपक हुडा आणि अश्विननं प्रत्येकी एक विकेट घेतली.

विराटचं विक्रमी शतक

यंदाच्या आशिया चषकात विराटनं याआधी दोन अर्धशतकं झळकावली होती. पण अफगाणिस्तानविरुद्ध विराट एका वेगळ्याच अंदाजात दिसला. रोहित शर्मानं विश्रांती घेतली आणि विराट सलामीला मैदानात आला. या संधीचा फायदा उठवत विराटनं सुरुवातीपासूनच अफगाणी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. विराटनं या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 122 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे तीन वर्षानंतर झळकावलेलं पहिलंच शतक ठरलं. नोव्हेंबर 2019 साली त्यानं अखेरची शतकी खेळी केली होती. त्यानंतर विराटच्या बॅटमधून धावा निघाल्या पण शतकानं मात्र त्याला हुलकावणी दिली होती. विराटच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं अफगाणिस्तानविरुद्ध 2 बाद 212 धाांवांचा डोंगर उभारला. विराटनं 122 तर लोकेश राहुलनंही 62 धावांचं योगदान दिलं

First published:

Tags: Asia cup, Sport, Virat kohli