विराटनं नाकारलं पण रोहितनं घेतलं, खेळाडू करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण

विराटनं नाकारलं पण रोहितनं घेतलं, खेळाडू करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण

भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये दोन नव्या खेळाडूंपैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणार असल्याचं रोहितनं सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : बांगलादेश दौऱ्यात विराट कोहलीला विश्रांती दिल्याने टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. रविवारी होणाऱ्या टी20 सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित शर्माने मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे पदार्पण करण्याचे संकेत दिले आहेत. रोहित शर्माने शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांचे कौतुक केलं आहे. सॅमसनच्या यष्टीरक्षणाच्या अनुभवाबद्दलही त्याने सांगितलं. रोहितने या दौन खेळाडूंपैकी एकाला संधी मिळू शकते असं म्हटलं आहे. तसेच सध्या ऋषभ पंत संघात असल्याने सॅमसनऐवजी शिवम दुबेला संधी मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

सामन्याच्या एक दिवस आधी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने सांगितलं की, आम्ही सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनवर विचार करू. संजू सॅमसन आणि शिवम दुबे संघात खेळण्याच्या शर्यतीत आहेत. त्यांच्यापैकी एकाला नक्कीच संधी दिली जाईल. प्रत्येकासाठी संघाचे दरवाजे खुले आहेत. कोणत्याही क्षणी कोणीही प्लेइंग इलेव्हनमध्ये असू शकतो.

शिवमने विजय हजारे स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळवले. 26 वर्षीय शिवमनं 48.19च्या सरासरीनं धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याला बांगलादेश विरोधात टी-20 संघात स्थान मिळाले. विजय हजारे स्पर्धेत शिवमनं 67 चेंडूत शानदार अशा 118 धावांची खेळी केली.

वाचा : 'धोक्याकडे दुर्लक्ष करू नका, तर..', BCCI वर भडकली बॉलिवूड अभिनेत्री

अष्टपैलू खेळाडू असलेल्या शिवम दुबे त्याच्या तुफान फटकेबाजीमुळे अनेकदा चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या टीमने 5 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. मात्र, 2019 च्या आयपीएलमध्ये त्याला फक्त 4 सामन्यात संधी देण्यात आली. त्यानंतर त्याला संघातून बाहेरं बसवलं होतं. त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. मात्र, विजय हजारे ट्रॉफी आणि इंडिया ए कडून खेळताना त्यानं जबरदस्त कामगिरी केली आहे.

हरमनप्रीतचा 'सुपरकॅच' पाहून तुम्हीही म्हणाल, म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 11:22 AM IST

ताज्या बातम्या