मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शानदार कामगिरीनंतरदेखील शुभमन गिलच्या वडिलांनी दिलेली 'ती' प्रतिक्रिया चर्चेत, मुलाकडून काय अपेक्षा आहे पाहा

शानदार कामगिरीनंतरदेखील शुभमन गिलच्या वडिलांनी दिलेली 'ती' प्रतिक्रिया चर्चेत, मुलाकडून काय अपेक्षा आहे पाहा

एखाद्या मुलाला 98 टक्के मार्क मिळाल्यावर अनेक पालक - पण दोन टक्के कुठे घालवलेस? असं विचारतात.  गाब्बा कसोटी सामन्यात (Ind Vs Asutralia) शुभमन गिलने (Shubhaman Gill) 146 चेंडूत 91 धावांची शानदार खेळी केली असली तरी वडिलांची अपेक्षा वेगळीच होती.

एखाद्या मुलाला 98 टक्के मार्क मिळाल्यावर अनेक पालक - पण दोन टक्के कुठे घालवलेस? असं विचारतात. गाब्बा कसोटी सामन्यात (Ind Vs Asutralia) शुभमन गिलने (Shubhaman Gill) 146 चेंडूत 91 धावांची शानदार खेळी केली असली तरी वडिलांची अपेक्षा वेगळीच होती.

एखाद्या मुलाला 98 टक्के मार्क मिळाल्यावर अनेक पालक - पण दोन टक्के कुठे घालवलेस? असं विचारतात. गाब्बा कसोटी सामन्यात (Ind Vs Asutralia) शुभमन गिलने (Shubhaman Gill) 146 चेंडूत 91 धावांची शानदार खेळी केली असली तरी वडिलांची अपेक्षा वेगळीच होती.

पुढे वाचा ...

मुंबई,21 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Ind vs Aus) चौथ्या टेस्टमध्ये भारताचा युवा बॅट्समन शुभमन गिल (shubman gill) ने सर्वांचं मन जिंकलं. ब्रिस्बेन टेस्टच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी गिलचं शतक थोडक्यात हुकलं. तो 91 रनवर बाद झाला. पण इंडियन टीमसाठी त्याने महत्त्वाची खेळी केली. या विजयानंतर गिल याने 'टीमला आनंदी ठेवण्यासाठी जिंकत राहणं हा एकच मार्ग’ असं ट्वीट केलं. या मॅचमध्ये इंडियन टीमच्या अनेक खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मनं जिंकली.

यामध्ये शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर या तरुण खेळाडूंनी या मॅचमध्ये शानदार खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. याचबरोबर शुभमन गिल(shubman gill) याने देखील शानदार बॅटिंग करत आपल्या टीमच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. परंतु त्याच्या या कामगिरीने सगळेजण समाधानी असताना त्याचे वडील लखविंदर गिल (Lakhwinder gill) हे त्याच्या या कामगिरीने समाधानी झालेले दिसत नाहीत. अन्य भारतीय पालकांप्रमाणेच त्यांना आपल्या मुलाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यामुळे त्यांनी शुभमनचे शतक हुकल्याची प्रतिक्रिया दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट करत त्याच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया एका क्रिकेट चाहत्याने ट्विट केली आहे. यामध्ये त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया दिसून येत आहे. हे ट्वीट सध्या व्हायरल होत असून अनेकांनी यावर प्रातिक्रिया दिल्या आहेत.

यामध्ये शतक त्याचा कॉन्फिडन्स वाढण्यास उपयोगी पडले असते अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे. तो खूप चांगला खेळत होता. परंतु अचानक त्याने शरीरापासून दूर असलेला बॉल का खेळला हा प्रश्न असल्याचे देखील म्हटले. ज्या पद्धतीने तो बाद झाला त्याबद्दल मला चिंता असल्याचे त्यांनी म्हटले. या ट्विटवर विविध प्रतिक्रिया येत असून भारतीय पालकांची मानसिकता कशी असते यावर देखील अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकाने मुलगा गुगलचा सीईओ(CEO) झाला तरीदेखील त्याचे पालक त्याला सरकारी नोकरीसाठी अर्ज करायला लावतील असे म्हटले आहे. तर एकाने तुम्ही तारे (Star) तोडून आणले तर पालक आकाशगंगा (Galaxy) उध्वस्त का नाही केली असे देखील विचारतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा - ICC Test Ranking : ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला ‘या’ बॅट्समननं टाकलं मागे

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ब्रिस्बेन टेस्टमध्ये शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) याच्या वडिलांनी देखील अशाच पद्धतीने शतक हुकले असल्याची प्रतिक्रिया दिली होती. या मॅचमध्ये गिल याने दुसऱ्या इनिंगमध्ये टीमला गरज असताना 146 बॉलमध्ये शानदार 91 रनची खेळी केली होती. त्याच्या पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने वेगवान ऑस्ट्रेलियन माऱ्याचा ज्या पद्धतीने सामना केला ते खरंच कौतुकास्पद आहे. भविष्यात देखील अशाच पद्धतीने मॅचविनिंग खेळी करण्याची त्याच्याकडून सर्व क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs Australia