News18 Lokmat

हिमाचा गोल्डन पंच, 19 दिवसांत पटकावलं पाचवं सुवर्ण

भारताची धावपटू हिमा दासने गेल्या 19 दिवसांत पाचवं सुवर्णपदक पटकावलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2019 08:00 AM IST

हिमाचा गोल्डन पंच, 19 दिवसांत पटकावलं पाचवं सुवर्ण

पराग्वे, 21 जुलै : भारताची युवा धावपटू हिमा दासची सोनेरी घोडदौड सुरूच आहे. हिमाने आता 400 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. याआधी हिमाने चार सुवर्ण पटकावली आहेत. गेल्या 20 दिवसांत तिचं हे पाचवं सुवर्णपदक आहे. यातील चार सुवर्ण पदकं 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील आहेत.

झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं 400 मीटर अंतर 52.09 सेकंदात पूर्ण केलं. हिमाची ही कामगिरी या हंगामातील सर्वोत्तम ठरली आहे. 2 जुलै रोजी तिनं पहिलं सुवर्ण पटकावलं. त्यानंतर सुवर्णपदकांचा धडाका तिनं कायम ठेवला आहे. यावर्षी तिला पाठदुखीमुळं आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं.

हिमाने पोलंडमध्ये पोजनान अॅथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो अॅथलेटिक्समध्येसुद्धा तिने आपली कामगिरी कायम राखली. 8 जुलैला झालेल्या स्पर्धेत हिमाने 23.97 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्ण पदकावर नावं कोरंल होतं. त्यानंतर क्लांदो मेमोरियल अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमानं 200 मीटर प्रकारात तिसरं सुवर्ण पटकावलं. हिमानं 200 मीटर अंतर 23.43 सेकंदात पार केलं. वर्ल्ड ज्यूनिअर चॅम्पियन असलेल्या आणि 400 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या हिमाची सर्वोत्तम वेळ 23.10 इतकी आहे. गेल्याच वर्षी तिनं ही वेळ नोंदवली होती. गेल्या वर्षभरापासून हिमा पाठदुखीने त्रस्त आहे. त्यातही तिने जबरदस्त कमबॅक करत आपली कामगिरी उंचावली आहे.

घर पाण्यात तरी, देशासाठी लढली हिमा

आसामची असणार हिमा दास हिचे घर पुरामध्ये वाहून गेले आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तिथलं जनजीवन विस्कळीत झालं असून महापूर आणि जमिन खचल्याच्या घटना घडल्या आहेत. आसाममध्ये एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 4 हजार 175 गावातील जवळपास 50 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीला एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत.

Loading...

पुरग्रस्तांसाठी दिले आपले अर्धे वेतन

हिमा दासनं आसाममधील पुरग्रस्तांसाठी तिचं अर्ध वेतन दिलं आहे. याशिवाय पुरग्रस्तांना मदत करा असं आवाहनही केलं आहे. आसाममध्ये पुरस्थिती बिकट असून जवळपास 50 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. यासाठी हिमाने इंडियन ऑईलकडून मिळणाऱ्या वेतनातील अर्धी रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत दिली आहे.

सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 08:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...