U19 World Cup 2020 : पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी झाली टीम इंडियाची घोषणा!

U19 World Cup 2020 : पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी झाली टीम इंडियाची घोषणा!

गतविजेता भारतीय संघ पाचव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी आहे सज्ज.

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर : पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये सिनिअर टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेत अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धा ही 19 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. टीम इंडिया तब्बल पाचव्यांदा विजेतेपदाचा किताब जिंकण्यासाठी मैदानात उतरेत. संघाचे कर्णधारपद हे प्रियम गर्गकडे देण्यात आले आहे. गर्गच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अनेक सामने जिंकले आहेत.

15 खेळाडूंच्या संघात उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्गच्या खांद्यावर संघाची जबाबदारी असणार आहे. तर, उप-कर्णधारपद ध्रुव चंद जुरेल याच्याकडे असणार आहे. अंडर-19 आशियाई कप स्पर्धेत भारतानं ध्रुवच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. मुख्य म्हणजे या 15 खेळाडूंच्या निवडीसाठी राहुल द्रविड स्वत: उपस्थित होता. याआधी राहुल द्रविड प्रशिक्षक असताना, अंडर-19 संघानं विजेतेपद पटकावले होते.

वाचा-VIDEO : त्रिशतकी खेळीनंतर वॉर्नरच्या हेल्मेटवरून भरमैदानात लहान मुलांमध्ये झाला

वाचा-अरेरे! लाईव्ह सामन्यात थोडक्यात बचावला स्मिथ, नाही तर घशात गेली असती बत्तीशी

रविवारी होणार होती संघाची घोषणा

वर्ल्ड कप 2020साठी भारतीय संघाची निवड रविवारी सायंकाळी होणार होती. मात्र सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमुळे आज भारतीय संघाची निवड झाली. आज सकाळी बीसीसीआयच्या वतीनं जानेवारीमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड केली. यासाठी डिसेंबरमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.

चारवेळा भारतानं जिंकला आहे वर्ल्ड कप

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. 2018मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत गतविजेते म्हणून उतरणार आहे. अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यात एकूण 48 सामने होणार आहे. 16 संघाचे 4 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या गटात जपान, न्यूजीलॅंड आणि श्रीलंका हे संघ असतील.

वाचा-BCCIचा मोठा निर्णय, 9 महिने नाही तर 5 वर्ष चालणार गांगुलीची ‘दादा’गिरी

असा आहे भारतीय संघ- प्रियम गर्ग(कर्णधार), ध्रुव चंद जुरेल(उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिळक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवि बिश्वनोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलकर, कुमार कुशाग्र(विकेटकीपर), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2019 01:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading