• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकमेकांना भिडणार, टीम इंडियाला वचपा काढण्याची संधी!

भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकमेकांना भिडणार, टीम इंडियाला वचपा काढण्याची संधी!

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील प्रत्येक मॅचची जगभरातील फॅन्सना मोठी उत्सुकता असते. यंदा टी20 वर्ल्ड कपमध्ये तब्बल दोन वर्षांनी या दोन्ही टीम क्रिकेटच्या मैदानात आमने-सामने आल्या होत्या

 • Share this:
   मुंबई, 7 नोव्हेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील प्रत्येक मॅचची जगभरातील फॅन्सना मोठी उत्सुकता असते. यंदा टी20 वर्ल्ड कपमध्ये तब्बल दोन वर्षांनी या दोन्ही टीम क्रिकेटच्या मैदानात आमने-सामने आल्या होत्या. या मॅचला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दोन्ही देशांमधील मॅच ही नेहमीच चुरशीनं होतात असा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्यातील लढतीकडं अनेकांचे डोळे लागलेले असतात. टी20 वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup 2021) शेवटच्या टप्प्यात आली आहे.  त्याचवेळी दोन्ही देशातील एका मोठ्या मॅचचं ठिकाण निश्चित झालं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या नाही तर कबड्डीची मॅच (India vs Pakistan International Kabaddi Match) निश्चित झाली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या 4 देशांच्या स्पर्धेपूर्वी (International Kabaddi Tournament) दोन्ही देशांमध्ये ही लढत होणार आहे. कर्तारपूर कॉरीडोरमध्ये (Kartarpur Corridor) मार्च महिन्यात ही लढत होणार असून दोन्ही देशांनी याला संमती दिली आहे. 'भारत आणि पाकिस्तान कर्तारपूर कॉरीडोरमध्ये आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहेत. दोन्ही देशांच्या संघटनेनं याला दुजोरा दि्ला आहे. दोन्ही टीम मॅच खेळण्यासाठी बॉर्डरवर येणार असून एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याची संधी आपल्या मिळणार आहे. एप्रिल महिन्यात लाहोरमध्ये चार देशांची आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार असून त्यापूर्वी मार्च महिन्यात ही मॅच होईल. याबाबतची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे, ' असं त्यांनी सांगितलं. NZ vs AFG: दर 8 बॉलला विकेट घेणारा अफगाणिस्तानचा बॉलर न्यूझीलंडवर पडणार भारी! भारत आणि पाकिस्तानच्या कबड्डी टीम फ्रेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये एकमेकांच्या समोर आल्या होत्या. त्यावेळी पाकिस्ताननं भारतीय कबड्डी टीमचा 43-41 असा निसटता पराभव करत वर्ल्ड कपवर नाव नोंदवलं होतं. आता पुढील वर्षी होणाऱ्या मॅचमध्ये या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय टीमला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: