India A vs West Indies A: विंडीज दौऱ्याआधी मनिष पांडेनं ठोकले शतक, भारतीय 'ए' संघाने पाडला कॅरेबियन टीमचा फडशा

India A vs West Indies A: विंडीज दौऱ्याआधी मनिष पांडेनं ठोकले शतक, भारतीय 'ए' संघाने पाडला कॅरेबियन टीमचा फडशा

भारतीय ए संघाने पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0ने विजय मिळवला आहे.

  • Share this:

अँटिगा, 17 जुलै : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. विंडीज दौऱ्याकरिता तीन दिवसात भारतीय संघाची निवड होणार आहे. दरम्यान याआधीच भारतीय ए संघाने सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत त्यांचा फडशा पाडला. यात कर्णधार मनीष पांडेच्या शतकी खेळीचे आणि कृणाल पांड्याच्या पाच विकेटचा समावेश होता. यामुळं वेस्ट इंडिज दौऱ्यात या दोन्ही खेळाडूंचा विचार होऊ शकतो.

पहिल्या फलंदाजी करताना इंडिया एने 295 धावा केल्या. दरम्यान वेस्ट इंडिज संघाला या आव्हानाचा पाठलगा करता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांना 147 धावांतच बाद केले. या विजयासह भारतीय ए संघाने पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0ने विजय मिळवला आहे.

सुरुवातीच्या झटक्यानंतर मनीष पांडेने संघाला सावरले

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीला आलेला अनमोलप्रीत सिंह भोपाळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शुभमन गील यांनी 109 धावांची भागिदारी केली. यात अय्यरनं 69 चेंडूत 47 धावा केल्या. त्यानंतर मनीष पांडेने भारताचा डाव सावरला. शेवटच्या ओव्हरमध्ये मनीष पांडेने शतक लगावले.

'या' फलंदाजांचा होऊ शकतो वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विचार

वर्ल्ड कपनंतरही चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनीष पांडेला संघात स्थान मिळू शकते. त्याचबरोबर सलामीला आलेला शुभमन गील यालाही संघात स्थान मिळू शकते. तसेच, पाच विकेट घेत भारताला विजय मिळवून देणारा कृणाल पांड्याचाही विचार होऊ शकतो.

असा असेल वेस्ट इंडिज दौरा

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल. या दौऱ्यासाठी 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी या दौऱ्यावर जाणार नाही. तर शिखर धवन देखील उपलब्ध असणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात संधी मिळू शकते.

VIDEO : विमा कंपनीचा अधिकारी सापडला शिवसैनिकांच्या ताब्यात, पुढे काय घडलं?

First Published: Jul 17, 2019 05:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading