South Africa A vs India A : विराटनं डावललं, भारतीय फिरकीपटूचा राग निघाला आफ्रिकेच्या फलंदाजांवर!

South Africa A vs India A : विराटनं डावललं, भारतीय फिरकीपटूचा राग निघाला आफ्रिकेच्या फलंदाजांवर!

5 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका अ संघाविरोधात भारतीय अ संघानं 1-0नं आघाडी घेतली आहे.

  • Share this:

तिरूअनंतपूरम, 29 ऑगस्ट : टीम इंडियाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनं आपल्या फिरकीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका अ संघाला उध्वस्त केले. वेस्ट इंडिज विरोधात होत असलेल्या कसोटी मालिकेत चहलची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळं कदाचित या सगळ्याचा राग चहलनं दक्षिण आफ्रिकेविरोधात हा राग काढला. इंडिया ‘अ’ संघाकडून खेळताना चहलनं शानदार खेळी करत 5 विकेट घेतल्या. चहलच्या या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारतानं 69 धावांनी हा सामना जिंकला. त्यामुळं 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0नं आघाडी घेतली आहे.

दरम्यान या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघान टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा सलामीचे फलंदाज शुभमन गील आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरुवात केली. शुभमन गीलनं आक्रमक खेळी करत 46 धावा केल्या. तर, ऋतुराज 10 करत बाद झाला. 12व्या षटकात शुभमन गीलला जॉर्न फॉर्टुइननं बाद केले. त्यानंतर युवा खेळाडू अनमोलप्रीत सिंहनं 29 धावा केल्या. पहिल्या तीन विकेट लवकर पडल्यानंतर कर्णधार मनीष पांडे यानं युवा इशान किशानसोबत 75 धावांची महत्तपूर्ण भागिदारी केली. भारताची धावसंख्या 5 विकेट 169 असताना भारताला सहावा धक्का बसला.

वाचा-दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी धोनीनं घेतला करिअरमधला सर्वात मोठा निर्णय!

वाचा-फक्त एक विजय आणि कोहली मोडणार धोनीचा सर्वात मोठा विक्रम!

शिवम दुबे आणि अक्सर पटेलचा डबल धमाका

भारताला आव्हानात्मक धावसंख्या देण्यासाठी शिवम दुबे आणि अक्सर पटेल यांनी मोलाची कामगिरी केली. दुबेनं 60 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. या खेळीत शिवमनं 6 षटकार तर 3 चौकार लगावले. तर, अक्सर पटेलनं 36 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 327 धावांचे बलाढ्या आव्हान दक्षिण आफ्रिका संघासमोर ठेवले.

वाचा-ऋषभ पंतवरचा विश्वास उडाला, टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियानं सुरू केली शोधाशोध!

चहलचा दक्षिण आफ्रिकेला पंच

भारतानं दिलेल्या 328 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामी फलंदाज रिझा हेनड्रिक्सनं शतकी खेळी केली. तर, हेन्री क्सासेननं 43 चेंडूत 58 धावा केल्या. मात्र युजवेंद्र चहलच्या फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा टिकाव लागला नाही. चहलनं मलान, ब्रीट्ज्के, क्लासेन, हेनड्रिक्स आणि ज्युनिअर डाला याच्या विकेट घेतल्या. मात्र त्यानंतरही सामनावीराचा पुरस्कार चहलला मिळाला नाही. तर, 60 धावा करत 2 विकेट घेणाऱ्या अक्सर पटेलला सामनावीर घोषित करण्यात आले.

वाचा-‘आफ्रिदीचं फक्त वय वाढलं, अक्कल नाही’, गंभीरच्या टीकेने वस्त्रहरण!

'क्रिकेटचा देव' पोहोचला त्यांच्या भेटीला आणि कॅरमही खेळला, पाहा हा VIDEO

First Published: Aug 29, 2019 07:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading