मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियासाठी दुर्लक्ष झालेल्या खेळाडूची आफ्रिकेत कमाल, निवड समितीला दिलं चोख उत्तर

टीम इंडियासाठी दुर्लक्ष झालेल्या खेळाडूची आफ्रिकेत कमाल, निवड समितीला दिलं चोख उत्तर

भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिजसाठी (India vs New Zealand Test Series) टीम इंडियात निवड न झालेल्या खेळाडूनं दक्षिण आफ्रिकेत दमदार खेळ करत निवड समितीला चोख उत्तर दिले आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 डिसेंबर: भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए (India A vs South Africa A) यांच्यातील दुसरी अनधिकृत टेस्ट ड्रॉ झाली. अंधूक सूर्यप्रकाशामुळे 'भारत ए' मॅच जिंकण्याचं स्वप्न साकार झाले नाही. भारतीय टीमनं 234 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना 3 आऊट 155 रन करत मॅचवर पकड निर्माण केली होती. त्याचवेळी खराब सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. खेळ थांबला तेव्हा 20 पेक्षा जास्त ओव्हर्सचा खेळ शिल्लक होता.

भारतीय टीमला मॅच जिंकण्यासाठी फक्त 79 रनची आवश्यकता होती, पण हवामानात सुधारणा न झाल्यानं मॅच ड्रॉ करण्यात आली. या मॅचमध्ये हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. त्यानं शुक्रवारी 116 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीनं नाबाद 72 रन काढले. विहारीनं पहिल्या इनिंगमध्येही अर्धशतक झळकावले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs New Zealand Test Series) त्याची टीम इंडियात निवड झाली नव्हती. आता आगामी आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्यानं निवड समितीला बॅटनं उत्तर देत, दावेदारी सादर केली आहे.

हनुमा विहारीप्रमाणेच अभिमन्यू इश्वरन यानेही या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. तो 55 रन काढून आऊट झाला. विहारी आणि इश्वरन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 133 रनची भागिदारी केली. अभिमन्यू आऊट झाल्यानंतर खराब सूर्यप्रकाशाचं कारण देत खेळ थांबवण्यात आला. या दोघांचा अपवाद वगळता अन्य भारतीय बॅटर्सना शुक्रवारी कमाल करता आली नाही. पृथ्वी शॉ ने 18 रन काढले. तर कॅप्टन प्रियांक पांचाळ शून्यावर आऊट झाला.

विराट, धोनी की नीरज चोप्रा? वाचा 2021 मध्ये कुणाला करण्यात आले सर्वाधिक Search

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 212 रन काढून ऑल आऊट झाली. इशान पोरेलनं 33 रन देत 3 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी आणि अर्झन नगवासवाल यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या. तीन मॅचच्या या सीरिजमधील तिसरी आणि शेवटची मॅच 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

First published:

Tags: Cricket, South africa, Team india