IND vs WI : निवड समितीच्या निर्णयावर नाराज झाला टीम इंडियाचा स्टार खेळाडू

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 03:07 PM IST

IND vs WI : निवड समितीच्या निर्णयावर नाराज झाला टीम इंडियाचा स्टार खेळाडू

अँटिगा, 23 जुलै : वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा झटका मिळाल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहेत. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे. यावेळी नवदीप सैनी आणि राहुल चहर या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. मात्र टीम इंडिया 'ए' संघातील एक युवा खेळाडू निवड न झाल्याबद्दल नाराज आहे.

टीम इंडिया 'अ' संघानं वेस्ट इंडिज 'अ' संघाला 5 सामन्यांच्या मालिकेत 4-1नं विजय मिळवला. या मालिकेत भारताचा युवा खेळाडू शुभमन गील याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. मात्र गीलला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत गीलनं भारतीय संघात स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गीलनं, "मी रविवारची वाट पाहात होतो की भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मला विश्वास होता की माझी संघात निवड होईल. मात्र एकाही संघात मला स्थान मिळाले नाही, त्यामुळं मी नाराज होतो. पण मी माझं काम करत राहणार, या गोष्टींवर विचार करत बसणार नाही", असे या मुलाखतीत सांगितले.

वाचा- कोहलीनंतर आता 'हा' पुणेकर टीम इंडियाचं नवं रन मशिन!

टीम इंडिया 'अ'कडून शुभमन गीलनं जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्यानं आतापर्यंत 38 सामन्यात 45.44च्या सरासरीनं 1545 धावा केल्या आहेत. अंडर-19चा स्टार खेळाडू शुभमन गील यानं आयपीएल 2019मध्ये शानदार खेळी केली होती. त्याला आयपीएलमध्ये उद्योन्मुख खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

Loading...

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, सिखर धवन, विराट कोहली(कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

वाचा-वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी!

कसोटी संघ : मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, अश्विन, जडेजा, कुलदीप यादव इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

वाचा-World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

VIDEO: कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी पूर्ण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...