मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Independence Day 2021: पंतप्रधान मोदींनी केलं खेळाडूंचं अभिनंदन, देशाला केलं खास आवाहन

Independence Day 2021: पंतप्रधान मोदींनी केलं खेळाडूंचं अभिनंदन, देशाला केलं खास आवाहन

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सहभागी झालेले सर्व खेळाडू लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) त्यांचा उल्लेख करत सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : संपूर्ण देशभर 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा (Independence Day Celebrations 2021) करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या निमित्तानं लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधानांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा खास उल्लेख केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोदींनी त्यांचा उल्लेख करत सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं. 'या टाळ्या वाजवून ऑलिम्पिक विजेत्यांचा सन्मान करा. या खेळाडूंनी फक्त देशाचा सन्मान वाढवला नाही, तर येणाऱ्या पिढीला दिशा दाखवली आहे.' या शब्दात पंतप्रधानांनी या खेळाडूंचा गौरव केला. भारताची सर्वोत्तम कामगिरी भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताने 1 गोल्ड, 2 सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ मेडल पटकावले. नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकत इतिहास घडवला. हे कोणत्याही भारतीयानं मिळवलेलं दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. तसंच अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला मिळालेलं हे पहिलंच ऑलिम्पिक मेडल आहे. Tokyo Olympics : मेडलविजेत्या खेळाडूंना सर्वात जास्त कशाची भीती वाटते? पाहा VIDEO भारताच्या पुरुष हॉकी टीमनं यंदा तब्बल 41 वर्षांनी ऑलिम्पिक मेडल पटकावलं. तर महिला हॉकी टीमनं आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला. पंतप्रधानांनी यापूर्वी हॉकी खेळाडूंशी फोनवरुन संवाद साधला होता. हॉकी प्रमाणेच बॅडमिंटन, कुस्ती आणि बॉक्सिंग स्पर्धेत भारतानं मेडल पटकावलं. तर गोल्फर आदिती अशोकनं अनेक दिग्गजांना मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला.
First published:

Tags: Independence day, Olympics 2021, PM narendra modi

पुढील बातम्या