• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • स्वातंत्र्यदिनी नीरज चोप्रानं जिंकलं मन, गोल्डन बॉयची कृती वाचून वाटेल अभिमान!

स्वातंत्र्यदिनी नीरज चोप्रानं जिंकलं मन, गोल्डन बॉयची कृती वाचून वाटेल अभिमान!

टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल विजेता खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) रविवारी सकाळी स्वतंत्रता दिवसाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल विजेता खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) रविवारी सकाळी स्वतंत्रता दिवसाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना निमंत्रण दिलं होतं. या कार्यक्रमाला नीरज तब्येत बरी नसतानाही उपस्थित होता. नीरज चोप्राला (Neeraj Chopra Fever) दोन दिवसांपासून ताप येत आहे. नीरज चोप्रा याला मागच्या दोन दिवसांपासून 103 डिग्री ताप आहे. ताप आल्यानंतर नीरज चोप्राची कोरोना टेस्ट (Corona Test) करण्यात आली, या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. डॉक्टरांनी नीरजला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. नीरज या आजारपणातही ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होता. नीरजनं कार्यक्रमाला जाण्यापूर्वी याबाबत प्रतिक्रिया दिली होती, 'मी आजवर हा कार्यक्रम टीव्हीवरच पाहिला आहे. आज तिथं प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे. हा नवा अनुभव आहे. भारतानं बऱ्याच वर्षांनंतर वैयक्तिक खेळात गोल्ड मेडल जिंकलं आहे. माझ्यामुळे देशवासियांना अभिमान वाटत आहे, ही खूप छान भावना आहे.' IND vs ENG : विकेट घेतल्यानंतर तोंडावर बोट का ठेवलं? सिराजनं सांगितलं कारण पंतप्रधानांनी केलं अभिनंदन टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोदींनी त्यांचा उल्लेख करत सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं. 'या टाळ्या वाजवून ऑलिम्पिक विजेत्यांचा सन्मान करा. या खेळाडूंनी फक्त देशाचा सन्मान वाढवला नाही, तर येणाऱ्या पिढीला दिशा दाखवली आहे.' या शब्दात पंतप्रधानांनी या खेळाडूंचा गौरव केला.
  Published by:News18 Desk
  First published: